राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेची बैलगाडीतून भव्य मिरवणूक
जामखेड तालुका प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, दलित, मागासवर्गीय, आदिवासी व गोरगरीब जनतेसाठी समर्पित केले. मागासवर्गीयांना आरक्षण लागू करणारे ते पहिले राजा होते. शिक्षण, आरक्षण आणि समतेचा संदेश देणारे शाहू महाराज प्रेरणास्थान आहेत.’स्त्री शिकली तर समाज उभा राहतो’ हा विचार रूजवून शिक्षणाचा हक्क दिला, असे गौरवोद्गार सरपंच संजीवनी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. सकाळी आकरा वाजता खर्डा येथील भुईकोट किल्ला ते बस स्थानकापर्यंत बैलगाडीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा ठेवून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाची सुरवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा खर्डा गावच्या सरपंच संजीवनी पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त तहसीलदार जयसिंग भैसडे, तसेच स्वागत अध्यक्ष ॲड डॉ.अरुण जाधव हे होते. या कार्यक्रमासाठी खर्डा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, डॉ.असोसिएशन चे अध्यक्ष डॉ .बिपिनचंद्र लाड,सुनील साळुंखे , विशाल पवार,वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष आतिश पारवे, रंजन मेघडंबर, दादासाहेब घायतडक,भिमराव सुरवसे,पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष थोरात, किशोर दुशी, बाळासाहेब शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की ,कुठलेही महापुरुष एका जाती धर्माचे नाहीत आणि त्यांना धर्माच्या चौकटीमध्ये बघू नका,तसेच शाहू महाराजांचे उपकार विसरून चालणार नाही. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत कराळे,मंगल शिंगाणे, उर्मिला कवडे, राजू शिंदे, ललिता काळे,अतिष पवार, कायदेशीर पवार,अविनाश काळे,वसंत पवार, गणेश पवार, पांडुरंग शिंगणे, सुरेश पवार, राहुल काळे, संदीप पवार, मुकेश काळे,लाला वाळके, डिसेना पवार, राहुल पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल पवार व सूत्रसंचालन निशा शिंगाणे, तुकाराम पवार तर आभारप्रदर्शन रेश्मा बागवान यांनी मानले.