अनिल वीर सातारा : श्री विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज नागठाणे यांच्यावतीने शैक्षणिक संकुलात संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्रा.विवेक पाटणे याचबरोबर नागठाणे नगरीचे कृषिभूषण मनोहर साळुंखे भाऊ, उपसरपंच अनिल साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विपिन साळुंखे, विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी सौ मीना झांजुणे, प्रा.शशिकांत चिरमे,मदन कदम, विपिन साळुंखे,सुभाष कुंभार, मनोहर भाऊ साळुंखे, विवेक पाटणे,सौ.अलका देसाई, महेश गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली, के, जानोजीराव साळुंखे हायस्कूल पाटण येथे भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून काम उत्तमपणे केले. या कालावधीत निबंध- वक्तृत्व स्पर्धा यात यश संपादन केले. वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्याने, कथाकथन सादर केले, संस्थेच्या व शाखेच्या भौतिक विकासासाठी आर्थिक मदत योगदान दिले.
मुख्याध्यापक म्हणून आदर्श विद्यामंदिर विंग येथे एक वर्ष या कालावधीत भौतिक सुविधा व गुणवत्ता विकासात आपला ठसा उमटला. नागठाणे येथील श्री रामकृष्ण शैक्षणिक संकुलात सन 2023-24 ते 2024-25 या दोन वर्षाच्या कालखंडातही शाळेचा गुणवत्तेवरोबरच शाळेला भौतिक सुविधा मिळवून देण्यासाठी योगदान केले. दहावी-बारावीचा उत्कृष्ट निकाल, कीडा विभाग, संगीत विभाग, स्पर्धा परीक्षा अशा स्पर्धेत राज्यस्तटांपर्यंत विद्यार्थी पोहोचले.