खिर्डी गणेशच्या सरपंच-उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याची माजी उपसरपंचाची मागणी

0

  कोपरगाव/ लक्ष्मण वावरे 

 कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथील सरपंच व उपसरपंच यांनी लिंबाची झाडे बेकायदेशीर तोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी खिर्डी गणेश ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सोपान दगुजी चांदर व रायभान पुंजा पगारे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कोपरगाव यांना आपल्या सहिनिशी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगावचे तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सोपान चांदर व रायभान पगारे यांनी म्हटले आहे की खिर्डी गणेश चे विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी आपली मनमानी करून ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील जुने लिंबाच्या झाडांचे  सौंदर्य नष्ट करून आपल्या डोळ्यात धुळफेक करून आपल्याकडून वाळलेल्या चार लिंबाची झाडे तोडण्याची परवानगी घेऊन प्रत्यक्ष मात्र हिरवेगार डौलदार लिंबाची झाडे तोडली ही झाडे गेली शंभर वर्षां पासूनची जुनी असून याला कुठलीही परवानगी घेतली नाही.

सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीत कुठलाही ठराव किंवा लिलाव केलेला नाही त्यांनी ही मनमानी केली असून वन विभागाने त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अशी चांदर व पगारे यांनी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या संदर्भात विद्यमान सरपंच चंद्रकांत चांदर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की आम्ही रीतसर वन विभागाची लेखी   पूर्व परवानगी घेतली असून तसा झाडे तोडणे अगोदर वन विभागाने प्रत्यक्ष त्या झाडांची पाहणी करत पंचनामाही केलेला आहे त्यानंतरच आम्ही सदरची धोकादायक असलेली झाडे तोडल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here