पैठण(प्रतिनिधी): कृषी दिनानिमित्त पोरगाव येथे वृक्षारोपण, विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करून ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सलग्न छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न या उपक्रमांतर्गत १ जुलै २०२५ रोजी पोरगाव ता. पैठण येथे वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला.
गावचे सरपंच प्रभाकर नीळ , ग्रामपंचायत अधिकारी विनायक इंगोले व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. खंबाट यांनी कृषी दिन आणि आपण कृषी दिन का साजरा करावा तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे संचालक मा.डॉ.जहागीरदार सर यांचे प्रोत्साहन लाभले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे व कार्यकम अधिकारी (रावे) डॉ. वाघमोडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
गावातील ग्रामस्थांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य गावाला लाभलेले कृषी दुत विद्यार्थी : शुभम साबळे, ऋषिकेश शिनगारे, शुभम शिंदे, स्मृती पाटील, वैष्णवी सानप, रेवन शिंदे, युवराज सुंदरडे, सलोनी राऊत, पुनम पवार, अनिरुध सरकटे, प्रणव सर्वज्ञ, अरहंत सिरसाट, सात्विक रेमल्ला,वेदांत शिंदे , आदित्य नेवारे सह समस्त पोरगाव गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते