फुलंब्री :- वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती कृषी दिन म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे अभिवादन सभा घेऊन साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील सहशिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी महाराष्ट्राचे तृतीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेती सुधारणा विषयक कार्याचा गौरव करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.सहशिक्षक नितीन शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे,मंगला पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांडू शेळके तर आभार प्रदर्शन संगीता वाढोणकर यांनी केले.