कुंभारी ग्रामपंचायतीचा समाजाभिमुख उपक्रम;

0

दिव्यांग व मागासवर्गीय कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे

पोहेगांव प्रतीनिधी ; कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या उत्पन्नातून ५% दिव्यांग कल्याण निधी व १५% मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत गरजूंना मदतीचे वाटप केले. ६ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ₹२५०० किमतीचे स्टँड फॅन, १४ अनुसूचित जातीतील कुटुंबांना प्रत्येकी ₹१००० किमतीचे किराणा किट याचे नुकतेच वितरण करण्यात आले.

 सामाजिक समतेचा, संवेदनशीलतेचा आणि कृतिशीलतेचा सुंदर संगम या उपक्रमात पाहायला मिळाला.कार्यक्रमप्रसंगी सरपंच सौ. देवयानी घुले , उपसरपंच  सौ. कविता निळकंठ, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक, माजी सरपंच प्रशांत घुले,माजी सरपंच श्रीधर कदम, अर्जुनराव घुले चंद्रभान बढे, भानुदास घुले, वसंत घुले, ललित निळकंठ, पुरुषोत्तम महाजन,भास्कर भारती, कारभारी व्होरे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप ठाणगे, रामराव चंदनशिव, राहुल  पवार ,संजय ठाणगे, अनिकेत कदम,  नानाभाऊ पवार ग्रामपंचायत सद‌स्या – ज्योती आहिरे, रंजना गायकवाड, मनिषा घुले, वैशाली बढे, रंजना वारुळे, जिल्हा परिषद स्कूल कमिटीचे अध्यक्ष अभिजीत चकोर, विकास वाघ, सिद्धांत घुले, रिलिस्टार आदित्य महाजन , ग्रामपंचायत अधिकारी रतन कहार, ग्रामपंचायत कर्मचारी निता कदम, रवींद्र व्होरे , शंकर चंदनशिव , पंचायत सदस्यगण, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणारी कुंभारी ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने समाजाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत आहे असे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक प्रशांत घुले यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असुन एकही घटक यापासून वंचित राहणार नाही याची काळजी ग्रामपंचायत स्तरावर घेतली जाते असे सरपंच देवयानी घुले यांनी सांगितले. शेवटी सर्वांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी रतन कहार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here