दारु धंदे तत्काळ बंद करा..! पिडीत महिलांची मागणी
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
पोलिसांच्या आशिर्वादाने राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारु विक्री केली जाते.कमी वयातील तरुण मुले दारुच्या आहरी जाऊन व्यसनाधिन झाले आहेत.याच दारुमुळे कमी वयातील अनेक तरुण मुले मयत झाले.यापूढील काळात दारुमुळे कोणी मृत्यूमूखी पडला तर त्याची सर्व जबाबदारी राहुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर राहिल.व त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या दालना समोर केला जाईल.असा संतप्त इशारा राहुरी फँक्टरी येथिल प्रसादनगर भागातील संतप्त महिलांनी दिला आहे.
राहुरी फॅक्टरी प्रसादनगर भागातील काही महिला व पुरुषांनी राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देवून अवैध दारु विक्री मुळे कमी वयातील तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेले आहेत.अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.अविवाहित तरुणांचे व्यसनाच्या अहारी जावून अकाली मृत्यू झाल्याने आई वडीलांचा म्हातारपणाचा आधार तुटला आहे.येथिल संतप्त महिलांनी राहुरी पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देवून राहुरी फॅक्टरी परिसरात पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध दारू विक्री जोमात सुरु असल्याचे निर्दशनास आणून दिले आहे.निवेदनाद्वारे संतप्त महिलांनी ठेंगे यांच्याकडे प्रसादनगर परिसरात राजरोसपणे दारु विक्री व्यवसाय चालू आहे. सदर दारु विक्रेत्यांचे मनपरिर्वतन किंवा कायद्याचा धाक दाखवून अवैध दारु विक्री व्यवसाय बंद करुन आमचे उद्वस्त होत असलेले प्रपंच वाचवा.अशी मागणी केली.तीन वर्षापूर्वी (२०२२)मधे संदर्भात आंदोलन छेडण्यात आले होते.संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.त्यावेळी पोलिसांनी अवैध दारु विक्री विरोधात कारवाई करुन अवैध दारु विक्री काही दिवसासाठी बंद केली होती.त्यानंतर नव्या जोमाने अवैध दारु विक्री जोमात सुरु झाली आहे.
प्रसादनगर भागातील संतप्त महिलांनी निवेदनात म्हटले आहे की,अवैध दारु विक्रेत्याना या भागातील महिलांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समजावून सांगीतले. परंतू ते कोणाचेही ऐकत नाही. उलट आम्ही पोलिसांना हप्ते देतो, तूम्हाला आमचे काय करायचे ते करा. असे उत्तर दारु विक्रेत्यांकडून दिले जाते. या परिसरातील जिल्हा परिषद शाळा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हनुमान मंदिर परिसरात व्यवसाय चालतो. काही तरुण दारु पिवुन तेथेच अश्लिल भाषा वापरुन करुन धिंगाणा घालतात.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.बाल वयात या विद्यार्थ्यांवर मनावर मद्यपींचा काय परिणाम होत असेल याचा विचार पोलिस खाते का करत नसेल?असा प्रश्न संतप्त महिलांनी विचारला आहे. तसेच या ठिकाहुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात, पैसे न दिल्यास शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देतात. वयात आलेल्या मुलींकडे दारु साठी पैसे मागताता पैसे नाही म्हटले तर त्या मुलींची छेडछाड केली जाते.
परिसरातील अवैध दारु व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनिता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थाबाई जाधव, जैतून भाभी, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे आदि महिला व पुरुषांच्या सह्या असून निवेदन देण्यासाठी ते उपस्थित होते.
शाळा शिकण्याच्या वयात दारुडे बनले!
या भागातील १५ ते १६ वर्ष वयातील मुले शिक्षण व्यवस्थेकडे पाठ फिरवून दारुच्या आहरी गेल्यामुळे तरुणपणाच्या उंबरठ्यावर पाय ठेवण्यापूर्वीच व्यसनाधिन झाल्याने लिव्हर खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक तरुणांनी मृत्यूला कवटळले आहे.त्यांच्या आई बापावर मोठा आघात होवून म्हारपणाची काठी गेल्याचे दुःख मनावर कोरले जात आहे.असे रेखा जाधव यांनी सांगितले.
….त्या बाल मनावर दारुड्याचे संस्कार होणार का?
प्रसादनगर भागातील जिल्हा परिषद मराठी शाळे समोर अवैध दारु विक्री केली जाते.विद्यार्थ्यासमोर हा सर्व प्रकार चालतो.काही वेळेस अतिप्रमाणात दारु सेवन केल्यामुळे दारुडा थेट शाळेच्या वरंड्यात झोपतो. शाळा चालू आहे किंवा बंद आहे याचे त्यांना भान राहत नाही.आहे त्याच जागेवर दारुडा सर्व विधी उरकतो, त्याने केलेली घान विद्यार्थ्यांना साफ करावी लागते.असे लक्ष्मीबाई पंडीत यांनी सांगितले.