सौ.पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते वृक्षारोपण

0

कोळपेवाडी वार्ताहर :- बचत गटाच्या महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा दाखवणाऱ्या गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये डॉ.कुणाल घायतडकर व डॉ.सौ.भाग्यश्री घायतडकर यांच्या पुढाकारातून सप्तशृंगी देवी मंदिर परीसर व श्री दत्त मंदिर परीसरात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, निसर्गाशी मैत्री करणं ही काळाची गरज आहे. झाडं ही केवळ हरित छटा नसून, ती आपल्या भविष्याचा श्वासं आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या संकटात, एक झाड लावणं म्हणजे केवळ रोपटं रोवणं नव्हे, तर ते जगवून पर्यावरणाचं नातं जोपासणं आहे. माझी आई सौ.पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतांना मला समाधान वाटतं की, आपण पर्यावरणाच्या संवर्धनाचा वसा घेत आहोत. निसर्गाचा समतोल राखल्याशिवाय विकासाचं चक्र पूर्ण होऊ शकत नाही. निसर्गाने आपल्याला अन्न, पाणी, हवा, औषधे दिली. झाड लावणं ही त्या ऋणाची परतफेड म्हणून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणं ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सौ.पुष्पाताई काळे यांनी बचत गटाच्या महिलांच्या आर्थिक उत्कर्षासाठी दिलेलं योगदान खूप मोलाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश जावा या उद्देशातून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. ज्या प्रमाणे सौ.पुष्पाताईंनी महिलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे बीज रुजवले त्याप्रमाणे  लावण्यात आलेले वृक्ष भविष्यात हिरव्या आशा घेऊन उभे राहणार असल्याचे डॉ.कुणाल घायतडकर यांनी सौ.पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपणा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती देतांना सांगितले.

याप्रसंगी कोपरगाव नगरपरिषद सुहास जगताप, सामाजिक वनीकरण अधिकारी निलेश रोडे, समृद्धी व्यवस्थापक हर्षा पाटील, बचतगट सहाय्यिका हेमा तवरेज, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य कल्याण वाघचौरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाअधक्ष कृष्णा आढाव,शहराधक्ष सुनील गंगुले,विशाल जगताप,दिनेश गाडेकर,माजी नगरसेवक अजीज शेख,सचिन गवारे,अमोल गिरमे,सोमनाथ आढाव,धनंजय देवकर,विशाल अल्हट,भिकाजी तुरकने, ह.भ.प. आण्णासाहेब शिंदे, सुनील काळे,अशोक नरोडे, बाबुराव कुटे,रमेश भालेराव,सोमनाथ लोहाटे,एकनाथ चव्हाण, सुभाष वैद्य, नितेश काळे, विलास पोतदार, बंडू पेटकर,आप्पासाहेब मोरे, प्रकाश पाटील, रमेश टोरपे, तात्यासाहेब पवार, सोपानराव जपे, दिग्विजय शेळके, महेश पेटकर, नितीन घायतडकर, सुखदेव घायतडकर,जालिंदर घायतडकर, सचिन चव्हाण, चंद्रकांत थोरात, नानासाहेब कासार, विठाबाई पवार, गायत्री कोल्हे, सुरेखा तुरकने, शोभाताई घायतडकर, नेहा शिंदे, प्रतिक्षा पारळकर, सोनाली पगारे, सुरेखा नरोडे, सविता काळे,आशाबाई कासार,मंगल महाले, प्रियंका जगझाप, अश्विनी चव्हाण, लक्ष्मीबाई शिंदे, आशाबाई कुटे, आशाबाई वाबळे, मंगल बोडके, कमल वराडे, तारा लोहाटे, संगीता काळे, गौरव घायतडकर, मंदाताई दुशिंग, बेबी कुटे, गंगूबाई चव्हाण, पुष्पा पवार, प्रतीक्षा घेमूड, छाया चव्हाण, जयश्री आहेर, शोभा भालेराव, चंद्रकला मोरे आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here