आम्ही धन्य ..

0

निळी शाईबोटाला

झालो आम्ही धन्य

हक्क  बजावताना 

आले भलते चैतन्य…

औटघटकेचा राजा 

झाला मनू सामान्य

जनता जनार्दनाचा

कौल  हो सर्वमान्य…

पेरणी तर केली बा

बरसो वेळी  पर्जन्य 

माहित नाही किती

कसे  उगवेलं धान्य….

मतदान होई  संपन्न

किंमत  आता शून्य

पुढारी जाती अन्यत्र

शोधे  मतदारा अन्य…

कर्तव्य सार्थ बजावून 

उपकृत करे अन्योन्य

धन्यवाद  संविधाना

दाव निदान सौजन्य… 

पुन्हा व्हावे कार्यमग्न

दिनचर्येस दे प्राधान्य 

लढा परत संकटाशी

गुंग कवायतीत सैन्य…

– हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996..

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here