साहित्यिक..

0

अगदी सरळ सोपे

साहित्यिक हे होणे

काॅपी पेस्ट  प्रकार 

आयडिया जे जाणे…

गुगल सर्च करताचं

मिळे बहुत नजराणे

संकलित करा लेख

कथा कादंबरीत राणे…

एकत्र अनेक उतारे

जराशीफोडणी देणे

वाचकांसाठी सादर

तयार  अमूल्य लेणे…

साहित्य चौर्य प्रकार 

भले रे कुणीही म्हणे

सच्च्या रूपयां पेक्षा 

चालतात खोटे नाणे…

कैक साहित्य प्रकार

सहजगती हाताळणे

भ्रष्ट साहित्य निर्मिती 

आपणा असे खेळणे…

एआय तंत्रज्ञान आले 

आता काही नसे उणे

प्रसिद्धी मिळे फटाक

द्यायचे  समाजा  लेणे…

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here