हव्यासा ..

0

निवडणूकी काळात 

हैदोस घालतो  पैसा

विकतघेताना आत्मे

जीव होतो वेडापिसा

कधीझकास फितूरी

तुरी  देतोसं पोलिसा

सोडवून आणे सहज

धरुठेवल्या ओलिसा

जागो जागी रंगलेला

उघड न् गुप्त जलसा

भुरळ  पाडी नजरेला

संस्थान करे खालसा

इलेक्शन अधिका-यां

हळू देई  कसा झासा

आडवे  येणार त्यांचा

गरमा गरम हो खिसा

न कळत कुणाच्याही

बरोबर टाकतो फासा

हव्यासाची कैक रूपे 

गळांसअडकतोमासा

कुठून पाझरतो  पैसा

हा प्रश्न लावावा धसा

आमच्या घरात  घुसा

आतंकास देतोव्हिसा

आज  आमचा खासा

तुडुंब भरणार  खिसा

भवितव्य लावेदावणी

भुलून मृगजळी  वेषा

–हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996..

 www.kavyakusum.com

२)

अस्तंगत ..

जरी सारे जाणकार 

बसताकाही बरळत

उच्च विद्याविभूषित 

वाहत जाती गरळत

अर्वाच्य शिवराळता

तुम्हांस नाही शोभत

निगेटिव्हपब्लीसिटी

कधीच नाही लाभत

कमरे खाली वार  ते

टिका करे व्यक्तीगत

मनात विष भिनलेले

म्हणूनि आली नौबत

आप्तांना हाकलू देई

दुष्मनांचे  हो स्वागत

लुटून गेले ते खजिने

आता  बसता जागत

जगाशी जुडता नाळ

आप्तांनीट ना वागत

देखावा अमूल्य दिसे

अंतरात नाही आगत

कायचूक काय योग्य

नेहमीचं होई गफलत

निर्णय मुद्दाम चुकीचे

अंगाशी येई माफलत

रे रंग बदलतात दिशा

सूर्य होताना अस्तंगत 

उद्यापुन्हा असे प्रभात

विसरुन जाई  पारंगत

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here