सातारा: महापुरुषांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही.तेव्हा सर्व बहुजनांनी संघटित होऊन सरकार विरुद्ध सत्ता हस्तगत केली पाहिजे. अन्यथा,अचानकपणे नोटाबंदी एका रात्रीत घोषित केली होती. त्याचप्रमाणे संविधान तथा राज्यघटना बदलतील.असा गर्भित इशारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला.
छ.शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची संयुक्त जयंती जळकेवाडी (कोयनानगर),ता. पाटण येथे बौद्ध विकास मंडळ हेळवाक-कोयना विभागांतर्गत पंचशील बौद्ध सेवा संघ (ढोकावळे) यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तेव्हा समारोप्रसंगी चंद्रकांत खंडाईत मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, “देशपातळीवर अन्यायकारक घटना सातत्याने घडत आहेत. त्यांचे सर्वत्र बहुमत असल्याने केव्हाही घटना बदलतील.तेव्हा प्रत्येक क्षणी सतर्क असणे गरजेचे आहे.२१ व्या शतकातील अनेक आव्हाने आ वासून उभारलेले आहेत.तेव्हा कार्यकर्त्यानी वाटसरुप्रमाणे महापुरुषांचे विचार सांगितले पाहिजेत. नेते मंडळी वरच्या पातळीवर जे निर्णय घेतात.ते खालपर्यंत पोहचवून प्रबोधनात्मक वज्रमुठ केली पाहिजे.आपापसात संघर्ष करू नये.केवळ महापुरुषांमुळेच आपले अस्तित्व आहे. बाबासाहेबामुळे सर्व क्षेत्रात प्रगती झालेली आहे.तेव्हा उतराई म्हणून समाजासाठी संधीचा फायदा उठवला पाहिजे.धम्म चळवळ झाली पाहिजे.मात्र,महापुरुषांचा विचारांवर क्रांती करण्यासाठीही सज्ज असले पाहिजे.फक्त उत्सव साजरे करता कामा नये. नाचगण्याबरोबर विचारांचा जागरही केला पाहिजे.क्रांती ही विचारावरच होईल.पुढील पिढीसाठी फुले-शाहु-आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचा अनमोल ठेवा जोपासला पाहिजे.”
कु.मानसी सदाशिव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.सीमा कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तदनंतर विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धांचा समावेश होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भ.गौतम बुध्द, छ.शिवराय व म.फुले यांच्या प्रतिमांना अनुक्रमे चंद्रकांत खंडाईत,बाळासाहेब जगताप व श्रीरंग वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याशिवाय,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता रमाई व जिजाऊ तसेच छ.शाहु महाराज आदी महापुरुषांच्या प्रतिमानाही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्ण करून अभिवादन करण्यात आले. सेवानिवृत्त बयाजी कांबळे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सदाशिव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सरपंच रेश्मा कांबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य बबन कांबळे,रुपेश कंठे,गंगाराम सकपाळ,अंजीरा कांबळे, रंजना सुर्वे,अंकुश कांबळे, कुसुम मोरे,पी.डी. लाड,महेंद्र कदम, अमोल कंबळे,सुनंदा कांबळे, उमेश कांबळे, रंजना सुर्वे,विलास कदम,प्रशांत देवकांत,वसंत जाधव,रेखाताई जाधव,श्रीपती माने,अरविंद गुजर,प्रकाश कांबळे, सुनील कदम आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.सभेपुर्वी, महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री उशिरापर्यंत विजयकुमार गायकवाड आणि पार्टीच्यावतीने प्रबोधनात्मक भिम-बुद्ध गीतांची मैफिल रंगली होती.सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक ग्राम,मुंबई व उत्सव कमिटीने अथक असे परिश्रम घेतले.