सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच
गोंदवले- दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा रोख रक्कम आणि वाहनांसह तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
वडगाव ,तालुका मान ,जिल्हा सातारा गावचे हद्दीत खोरी पाझर तलावाजवळ असलेल्या शेतातील शेडमध्ये तीन पाणी पत्त्यावर पैसे पैंजेवर लावून काही इसम जुगार खेळत असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टाफ सह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी
1) पंकज दादा ओंबासे
2) राजेंद्र आबाजी बागल
3) प्रकाश ब्रह्मदेव जाधव
4 )हनुमंत भगवान करवले
5)राजेंद्र किसन ओंबासे
हे जुगार खेळताना मिळून आले. त्यामुळे तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण 8 लाख 53 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई दहिवडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. अक्षय सोनवणे,पोलीस हवालदार खांडेकर,पोलीस नाईक प्रमोद कदम,प्रकाश इंदलकर,महिला पोलीस रजपूत मॅडम यांनी केली.
छाया- दहिवडी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या इसम.