कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरित्या  डांबून ठेवलेली वासरे प्रकरणी सुमारे सव्वा दहा लाख रुपयांचा  मुद्देमाल जप्त 

0

फलटण प्रतिनिधी. :

                 फलटणमधील कुरेशी नगर येथे एका टेम्पोत कत्तल करण्याच्या हेतूने लहान वासरे बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गाडीसह एकूण सव्वा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

                 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. पाच मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पुरेशी नगर येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या जवळ शाहिस्ता कुरेशी यांनी त्यांच्या आयशर कंपनीच्या टेम्पोमध्ये( क्रमांक एम एच 25 यु 0915  ) 21 लहान वासरे डांबून ठेवली होती. ती पाच ते दहा दिवसांची जर्सी गायची नर जातीची काळी पांढरी रंगाची वासरे आणि अंदाजे एक वर्ष वयाचे जर्सी गायची नर  बेकायदेशीरित्या डांबून ठेवण्यात आल्याचे आढळले होते. टेम्पो ची किंमत दहा लाख रुपये असून जनावरांची किंमत सुमारे पंचवीस हजार रुपये इतकी होत आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे याप्रकरणी पोलीस शिपाई काकासाहेब करणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार विरकर करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here