छ.शिवरायांनी सर्वधमसमभाव जोपासला होता.

0

सातारा : शिवाजी महाराजांनी राजाभिषेकेचा निर्णय हा परकीय सत्तांशी राज्यव्यवहार करता यावा.राजदंड आणि न्यायदंड वापरता यावा.तसेच त्यांनी सर्वधमसमभाव जोपासल्याचे द्योतक आहे. येथील छ. शिवरायांच्या पुतळ्यास शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते व शिप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        चिटणीस बाळाजी आवाजी (कायस्थ) यांनी राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीवरून गागाभट्टला निमंत्रित करण्यासाठी सोमनाथभट, भालचंद्र भट, केशव भट आणि निळो येसाजी यांना पाठविले.६ जून हा राजाभिषेकाचा दिवस ठरला. तत्पूर्वी व्रात्यास्तोम विधी करण्यासाठी गागाभट्टाने शिवरायांकडून ७००० होन दक्षणा म्हणून घेतल्या होत्या.एक होन म्हणजे शिवकाळातील तीन रुपये होय. होन हे सोन्याचे तर शिवराई हे तांब्याचे नाणं होते. एक होन म्हणजे सुमारे तीन ग्रॅम सोन.राजाभिषेकप्रसंगी शिवरायांची सुवर्णतुला करण्यात आली. शिवरायांचे वजन १६० पौंड (७२.५७ किग्रॅ) भरले. असे प्रत्यक्षदर्शी ईस्ट इंडिया कंपनीचा हेन्री ऑक्सिन्डेन सांगतो.शिवाजी राजाने आपल्या रक्ताचे पाणी करुन स्वतःच्या कर्तुत्वावर, हिम्मतीवर व मनगटाच्या जोरावर “स्वराज्य” उभारले होते.७८ वयांच्या जीजाऊचे वैदिक राजाभिषेकाच्या १० व्या दिवसी निधन झाले होते.प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात की, “संभाजीराजांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी केला होता.शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून शुद्र-अतिशुद्र एक नाही हे सिद्ध केले. संत तुकाराम महाराज म्हणतात,

“तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती। ब्राह्मणी तथा वैदिकधर्माशी असणारी संगत सोडा.” छ. शिवाजी-संभाजी महाराजांनी केलेला दुसरा राज्याभिषेक हे एक प्रकारचे धर्मांतरच होते.

   शाक्त संस्कार सम्पन्ने। जातिभेदं न कारयेत।। अर्थात, शाक्त धर्माची दिक्षा ग्रहण करणाऱ्यानी जातीभेद करु नये. शरद पाटिल लिखीत पुस्तक “शिवाजीचे खरे शत्रु कोण ? शिवाजी महाराजांनी शाक्त धर्माचा स्विकार केला व तसेच शाक्त तांत्रिक राजाभिषेक केला. महाराजांनी ३५० किल्ले बांधले होते. परंतु किल्ल्यावर पुजा किंवा मंदिरही बांधले नाही.पण, शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधल्या त्याचे पुरावे आजही दरबारी व गडावर उपलब्ध आहेत.शिवाजी महाराजांनी कधीही भविष्य पाहिले नाही.शिवाजी महाराज स्वतः धार्मिक होते पण त्यांनी काटेकोरपणे सर्व धर्म समभावाचे पालन केलेले होते. इंग्रज भारतात येण्या अधिपासून निधर्मी संकल्पनेचे त्यांनी “निर्वाहन” केले होते.शिवाजी महाराज हिंदूच्याच नव्हे तर मुसलमानाच्याही धार्मिक प्रतिकांचा सन्मान व आदर करित असत. महाराजाना संत तुकारामांचा जसा आदर होता. तसाच हजरत पीर सय्यद बाबा याकूत यांचाही आदर होता. रत्नागिरी जिल्ह्यातिल समुद्रकिनाऱ्यावर बाणकारच्या खाडीजवळ “कलसी” या गावचे मुसलमान संत सय्यद बाबा याकूत यांचा सन्मान ते करत असत. शिवाजी महाराज संत तुकारामांना जसे गुरु मानत तसेच ते हजरत पीर याकूत बाबांनाही गुरु मानत असत. शिवाजी महाराजांचा विजय ते धर्मनिष्ठ असल्यामुळे झाला असता तर त्यांच्या कडे अनेक मुसलमान वीर कसे आले असते? सर्व मुसलमान सरदार व पठाण दौलत खान, इब्राहिम खान, काझी हैदर, नूरखान बेग सरदार व सैनिक शिवाजी महाराजांशी त्यांच्या “स्वराज्याशी” इमानदार राहिले होते. जीवनात धर्मच जर महत्त्वाचा असेल तर आज जगातली मुसलमान राष्ट्रे एकमेकांविरूध्द लढताना का दिसतात? शिवाजी महाराज धार्मिक होते पण त्यांनी काटेकोरपणे “सर्वधर्मसमभाव” पाळला होता. तोही ब्रिटिशपूर्व काळात जेव्हा निधर्मीपणाची संकल्पना वा संस्था उदयास आलेली नसूनसुध्दा त्यांनी सर्वधर्मसमभाव पाळला. हे शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रूही कबूल करत.आज भारतात धर्माच्या नावाने जे काही चालले आहे ते सत्यशोधक नजरेतुन पाहिले असता असे चित्र दिसते की देशात, “धर्म बुद्धीची बाब राहिली नसून तो भावनेचा विषय झाला आहे.” धर्म जेव्हा भावनिक होतो तेव्हाच धर्म हा शाश्त्राचा विषय न राहता धर्माचेच शश्त्र केले जाते. शिवाय, ह्या धर्म शश्त्राच्या हत्याराचा उपयोग जसा परधर्मियांच्या विरोधात केला जातो. तसाच ह्याचा उपयोग स्वधर्मियाना धाकात ठेवण्यातही केला जातो.धर्म जेव्हा अनुभवण्याचा विषय न राहता केवळ विश्वासाचा विषय बनतो. अशा धार्मिक विश्वासाला जेव्हा श्रध्देची साथ मिळते तेव्हा ही श्रध्दा अंधविश्वासात होण्यास वेळ लागत नाही.धर्मासाठी माणसं मरायला व मारायला तयार होतात. धार्मिक दंगलीत माणसा सारखी माणसं “कणसा” सारखी खुडली जातात.तेव्हा शिवाजी महाराजांचे राज्य हे समता, स्वतंत्रता,बंधूता व न्यायाचे व्हावे. ही शिवाजी महाराजांची इच्छा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here