वर्धनगड : काल रात्री साडेआठच्या सुमारास क्षेत्र माऊली येथे भाऊ जाधव यांच्या घरातील हॉलमध्ये भाऊ जाधव यांच्या मालकीच्या जागेमध्ये टाकलेली पानपट्टी काढायला लावली म्हणून दोन इसमांनी त्यांच्याकडे माफी मागण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या कपाळावर डोक्यात तसेच डाव्या हाताच्या तळव्यावर तसेच त्यांची पत्नी यांच्या उजव्या हाताच्या पंजावर व भाऊ जाधव यांचा मित्र यांच्या डाव्या कोपऱ्यावर व उजव्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. असल्याची फिर्याद सातारा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देऊन, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोहरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून पुण्यातील मुख्य आरोपी हा मसूर फाटा येथे शेतात असल्याची गोपनीय माहिती मिळताच, मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या पथकाने मुख्य आरोपीचा मसूर फाटा येथील शेतात रात्री शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी 12 तासाच्या आत जेरबंद केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपाधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
या कमी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र बोहरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे,अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले प्रवीण फडतरे, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, गणेश कापरे,मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत,मोहित निकम, विशाल पवार,पृथ्वीराज जाधव, अमृत करपे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री पोलीस अधीक्षक समीर शेख व उपाध्यक्ष बापू बांगर यांनी अभिनंदन केले.