सातारा : जगात अनेकाएक विचारसरणी आहेत.मात्र,त्यामध्ये सध्यपरिस्थितीनुसार बुद्धविचारच मानवास तारू शकेल.कोणत्याही क्षेत्रात इप्सित साध्य करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला तर नुकसानच होत असते.असे विचार डॉ.विलास खंडाईत यांनी व्यक्त केले.
डॉ.विलास खंडाईत यांच्या अभिष्टचिंतनपर विविध संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.तेव्हा आजची राजकीय परिस्थिती या विषयांवर चर्चा-विनिमय करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.यावेळी शाहीर प्रकाश फरांदे,चंद्रकांत खंडाईत,संजय नितनवरे,श्रीरंग वाघमारे,अनिल वीर आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी नेते व कार्यकर्त्यानी पूर्वी केलेल्या वक्तव्यावर खुमासदार चर्चा करण्यात आली. एका-दोघांनी एकत्र येऊन यश मिळणार नाही.सन्मानानेच एकत्र येणे काळाची गरज आहे. गटातटामुळे बहुजनांचेच नुकसान होत आहे. तेव्हा कोण्हीही संकुचित विचार धारा घेऊन संघर्ष करू नये. प्रत्येक नेत्यांनी आपणास अनेक संघटना समूहातून वगळले जाऊ नये.याचीही दक्षाता घेतली पाहिजे.राजकारणात एकामेकास खेचण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा कोण्हीही खचून जाता कामा नये.स्वार्थासाठी मांडवलीही करू नये.सरतेशेवटी सत्ताधारी यांना नामोहरण करण्यासाठी सर्वानी एक झाले पाहिजे.यावर एकमत होऊन रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
फोटो : डॉ.विलास खंडाईत यांचा अभिष्टचिंतनपर सत्कार करताना मान्यवर.