जामखेड तहसील कार्यालयासमोर सर्वधर्मीय नागरिकांनी त्या शिक्षकाचा केला निषेध
जामखेड तालुका प्रतिनिधी –
जामखेड येथील अल्पवयीन विद्यार्थीनी मुलीवर नराधम शिक्षकाने केलेला अत्याचार समाजात काळीमा फासणारा असून त्याचा निषेध जामखेड येथील सर्व समाजाने तहसील कार्यालयासमोर करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच आष्टी येथील हॉटेल व लॉजमालकाचे लायसन्स रद्द करून याप्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना शुक्रवारी देण्यात आले.
अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून अत्याचार प्रकरणी जामखेड येथील सर्वधर्मीय नागरिकांनी मोठय़ा संख्येने तहसील कार्यालयासमोर एकत्र येऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शिक्षक राधे उर्फ राधाकिसन जगन्नाथ मुरुमकर (रा. साकत) याने शाळेच्या माध्यमातून व अभ्यासाच्या माध्यमातून सोशल मिडिया द्वारे अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न फोटो मागवून ब्लॅकमेल करून तीस मौजे आष्टी हद्दीतील हर्षद हॉटेल येथे घेवून जावून बळजबरीने बलात्कार केला व सदर प्रकार कोणास सांगितला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
सदर प्रकार अतिशय निंदनीय असून तसेच ज्या ठिकाणी हा प्रकार घडला ते आष्टी तालुक्यातील हॉटेल हर्षद अथवा हॉटेल हर्षदचे मालक यांनी ज्या अल्पवयीन मुलीचे कोणतेही आधार कार्ड अथवा कोणतेही वयाचा प्रमाणपत्र न घेता आरोपीशी संगनमत करून रूम देवून गुन्हा केलेला आहे. त्यास देखील सह आरोपी ह्या गुन्ह्यात करण्यात यावे व त्याच्या लोजिंगचे लायसन्स रद्द करण्यात यावे व पुन्हा या प्रकारचे गुन्हे होणार नाही याची दखल घ्यावी.
तसेच शिक्षक यांची पूर्व चौकशी व चरित्र पडताळणी केल्याशिवाय नोकरीस ठेवू नये. या प्रकारचा गुन्हा परत घडणार नाही तसेच कोणत्याही लेकीस व विद्यार्थिनीं बळी पडू नये या नराधमास जास्तीत जास्त शासन व्हावे व शिक्षा व्हावी तसेच हॉटेल हर्षद यांचे लॉज परवाना रद्द करण्याचे मागणी करत असून हॉटेल हर्षदचे मालक यांना गुन्ह्यात सह आरोपी म्हणून गोवण्यात यावे असे निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसेकर व पोलीस निरिक्षक महेश पाटील यांना देवून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला.
यावेळी वसीम कुरेशी, भाजपाचे नेते जमीर बारूद , राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष ऊमर कुरेशी, शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने, भिम टोला चे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, प्राचार्य विकी घायतडक, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक दिगांबर चव्हाण, संभाजी ब्रिगेड चे ता. अध्यक्ष कुंडल राळेभात, पाटोदा मा. संरपच समीर पठाण, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, शेख जुबेर, कॅ. लक्ष्मण भोरे, नगरसेवक आर्शद शेख, अतिक शेख, वसीम सय्यद, सद्दाम तांबोळी, तौसिफ पठाण, मजहर खान, अशपाक सय्यद, अरबाज शेख आदी नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा कैलास माने, समीर पठाण, संभाजी ब्रिगेड चे ता. अध्यक्ष कुडंल राळेभात, उमर कुरेशी, विकी सदाफुले, लक्ष्मण भोरे, दिगांबर चव्हाण, नय्युम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच नायब तहसीलदार मनोज भोसेकर व पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .