सकारात्मकतेमुळे यश मिळते : प्रा.अरुण अडसूळ

0

सातारा/अनिल वीर : नको मत्सर,नको द्वेष व डोळ्यात डोळे भिडवून बेधडक वावर असला पाहिजे.कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचारधारेला तिलांजली दिली पाहिजे.तरच यश खेचून आणता येते.असे प्रतिपादन प्रा.अरुण अडसूळ यांनी केले.

                येथील कै.डॉ.व्ही.एस. गदगकर सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे बदलते स्वरूप स्पर्धेची तिवृता आणि ग्रामीण भागातील विध्यार्थी मुक्तसंवाद मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा माजी एमपीएस सदस्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अरुण अडसूळ मार्गदर्शन करीत होते.यावेळी किसनवीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विनोद वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.अडसूळ म्हणाले,”अपयशाला सामोरे गेले पाहिजे.अब्राहम लिंकनला ७ वेळा अपयह आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते. तेव्हा जिद्द व चिकाटी बाळगली पाहिजे.१८ ते २८ वयोगतातच खूणगाठ बांधली पाहिजे.तरच यश प्राप्त करता येते.वाचन व चिंतन सातत्याने केले पाहिजे.”

          नुकताच मुंबई येथे पदभार स्वीकारलेले सातारचा विद्यार्थी स्वप्नील म्हणाले,”सिलेक्शन महत्वाचे नाही आपल्या सोबत कोण आहे? याबाबत सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.”

                  यावेळी विविध स्पर्धां परीक्षामधून अधिकारी पदावर निवड झालेले अध्ययनार्थी, आयआयटी,जी.नीट व सेट मधून यशस्वी झालेल्या गुणवंताचा सत्कार अरुण अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला.वडी येथील कु.विजया सुनील कदम हिने सीईटी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून सुयश मिळविल्याने तिचाही अडसूळ यांनी पालकासमवेत सत्कार केला. सदरच्या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी,उपशिक्षणाधिकारी व्ही.साहेब,गुणवंत,पालक,नेते चंद्रकांत खंडाईत,अनिल वीर, पत्रकार व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here