सातारा : संयुक्त जयंती समारोह समितीतर्फे लोकराजा राजर्षि शाहु महाराज यांची १४९ व्या जयंती महोत्सवानिमित्त सोमवार दि.२६ ते बुधवार दि.२८ अखेर विविध कार्यक्रमासह व्याख्यानांचे आयोजन केलेले आहे.अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.शाहु चौक येथे विजय निकम यांनी तर संबोधी प्रतिष्ठानतर्फेही ऍड.हौसेराव धुमाळ यांनी सविस्तर माहिती दिली.
येथील डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात वंदनेनंतर वरील घोषणा करण्यात आलेल्या आहेत. प्रारंभी,पुतळ्यास पुष्पहार भन्ते दिंपकरजी, बी.एल.माने,यु.डी. पोळ व घोडके यांनी अर्पण करून अभिवादन केले.यावेळी प्राचार्य प्रकाश रणबागले,अंकुश धाइंजे, सुदर्शन इंगळे,एन.डी.कांबळे, रमेश जाधव,जे.डी.कांबळे, सत्यवान गायकवाड,विलास कांबळे,अनिल वीर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहु चौकात सकाळी ८.३० वा.दरवर्षीप्रमाणे अभिवादन कार्यक्रम होणार आहे. येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभा मंडपात होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी ९.२० वा. धम्म ध्वजारोहण,वंदना व सुत्तपठण. ९.३० वा. लोकराजा राजर्षि शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन सकाळी १० वा. अदिनाथ बिराजे यांचे, “लोकराजा राजर्षि शाहु महाराज यांचे समग्र विचार” या विषयांवर व्याख्यान होणार आहे.याशिवाय,सबोधी प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी ५।। वा. पाठक हॉलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे आधुनिक समाज निर्मितीचे योगदान अतिशय मोलाचे आहे. ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. या हेतूने, “शाहू छत्रपती आणि सामाजिक न्याय” या विषयावर प्रा.निरंजन फरांदे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठाचे विभागीय दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र,साताराचे समन्वयक राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. सूर्यकांत गायकवाड भूषविणार आहेत.
संयुक्त जयंती समारोहतर्फे मंगळवार दि.२७ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज सायंकाळी ६ वा. प्रा.डॉ. अनिल जगताप यांचे “महाराजा सयाजीराव गायकवाड आणि फुले-शाहु-आंबेडकर विचारधारा” या विषयांवर व्याख्यान होणार आहे.बुधवार दि. २८ रोजी सायंकाळी ६ वा. मारूती भोसले यांचे,”रयतेचे राजे छ.शिवाजी महाराज आणि फुले – शाहु – आंबेडकर विचारधारा” या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.तेव्हा ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास शहरांतील नागरिक, उपासक व उपासिका यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.