अतिवृष्टी अनुदान मिळेना, दोन लाखाच्या वरती कर्जमाफी हवेत विरली… लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले
कोपरगाव (वार्ताहर) : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान सरकारने जाहीर केले मात्र अनेक शेतकरी या अनुदानापासून अजून वंचित आहेत. तर दोन लाखाच्या वरती कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत विचार करणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाली होती मात्र मात्र ते शेतकरी अद्याप पर्यंत या कर्जमाफीच्या आशेवर जगत आहे तर मागच्या खरिपामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते त्याचे अनुदान सरकारने जाहीर केले मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावरते अनुदान जमा झालेले दिसत नाही. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पन्नास हजार रुपये मिळाले नाही तर दोन लाखाच्या वरती कर्जमाफी हवेतच विरली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असे आवाहन कुंभारीचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी व नियमित कर्जाची परतफेड करणारे अनेक शेतकरी असून त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी 50 हजार देण्याचे घोषणा केली होती ती रक्कम काही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी कुंभारी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी केली. शेतकऱ्यांना सोसायटीचे कर्ज असेल राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज असेल ते भरण्याचं 30 जून ची मुदत असते अद्यापही शासनाचे पैसे मिळाले नाही तरी लवकरात लवकर शासनाने ते पैसे शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करावे. मागील हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला त्यामुळे त्यांचे हातून खरिपाचे पीक वाया गेले होते तर रब्बी हंगामाचे उभे करताना त्यांना खूप मोठी कसरत करावी लागली होती त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट कांद्याचे नुकसान झाले आहे खरीप पिकाचे पीक उभे करताना त्यांना पैशाची जमा जमा करताना कष्ट पडेल त्यात सरकारने लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखावरील कर्ज होते त्यांचे अद्यापही पैसे त्यांना पण माफी दिली नाही उर्वरित पन्नास हजार प्रस्थान पर अनुदान देणार होते ते बरेचशे शेतकरी अद्यापही लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला मातीमोल भाव कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही. कापूस पडला शेतकऱ्यांच्या घरी कांदा पडला बांधावरती सरकार म्हणते शासन आपल्या दारी, अशा परिस्थितीत परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवन कसं जगायचं हे सरकारला केव्हा कळेल, शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तात्काळ जमा करून शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी केली आहे.