अदानी समुहातर्फे ठेकेदार गौरव उत्सव संपन्न.

0

उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे ) अदानी ग्रुप च्या एसीसी सिमेंट  व अंबुजा सिमेंट तर्फे ठेकेदारांचा गौरव उत्सव रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हॉटेल आनंदी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला एसीसी व अंबुजा सिमेंटचे डीलर, रिटेलर ठेकेदार सहभागी झाले. या सोहळ्यामध्ये अदानी समूहाचे अधिकारी  रामेश्वर जाधव यांनी कंपनीची विविध उत्पादने , त्यांची गुणवत्ता , तसेच कंपनी तर्फे दिली जाणारी तांत्रिक सेवा याबद्दल माहिती दिली  यावेळी उरण तालुक्यातील उत्कृष्ट कंत्राटदारांना अधिकारी रामेश्वर जाधव,सचिन पवार, विकास पाटीदार यांच्या हस्ते पारितोषिक व शाल देऊन  गौरविण्यात आले. तसेच सोहळ्याची शोभा  वाढविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कॉन्ट्रॅक्टरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कॉन्ट्रक्टरांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर सोनसुरकर, सागर घोगरे यांनी विशेष मेहनत घेतली. तेजल पाटील,अजय जोशी, माजिद राजा,एकेंद्र भूल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here