इंग्लिश स्कूल व कै.ता.बं.ढाणे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट पाडळी निनाम या विद्यालयाची दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

0

सातारा/अनिल वीर : रयत शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल व कै.तानाजी बंडू ढाणे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट पाडळी निनाम ता.सातारा या विद्यालयाचे मार्च 2023 च्या परीक्षेत इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागला असुन नागठाणे केंद्रात प्रथम येण्याचा मान विद्यालयाला मिळाला असून विद्यालयात कुशर्वरी पवार हिने 94.40 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.

      व्दितीय क्रमांक श्रुती सुतार हिने 93.20 टक्के,तृतीय क्रमांक  भक्ती ढाणे हिने 91.20 टक्के, चतुर्थ वेदांत ढाणे 90.20 याने टक्के व पाचवा क्रमांक श्र्वेता ढाणे हिने  89.20 टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले आहे.एकूण 18 विद्यार्थी 75 टक्केच्यावर आहेत.प्रथम श्रेणीत 26 विद्यार्थी आले आहेत. 

 इयत्ता बारावीत स्वप्निल वाटाबळे याने 70 टक्के,जयश्री पवार याने 61. 30 टक्के,ज्योती घोरपडे हिने  57.17 टक्के गुण मिळवुन अनुक्रमे यश संपादन केले आहे. यशस्वी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव, गायकवाड,सावंत,काळे, गायकवाड आदी शिक्षक-शिक्षकेत्तर तसेच बारावीचे मार्गदर्शक शिक्षक पवार माने मॅडम.चव्हाण मॅडम आदींनीही मार्गदर्शन केले होते. 

    याबद्धल मुख्याध्यापक,शिक्षक –  शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सदस्य यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here