अध्ययनार्थींच्या करिअरला दिशा देण्यास नेहमीच कटिबद्ध : शिरीष चिटणीस

0

सातारा/अनिल वीर : दीपलक्ष्मी पतसंस्था  समाजात काम करत असताना सभासदांच्या पाल्यांनी   मिळवलेल्या विशेष प्राविण्यला नेहमीच प्रोत्साहन देत आहे. अध्ययनार्थींच्या करिअरला दिशा देण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे.असे प्रतिपादन संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले.

       दीपलक्ष्मी पतसंस्था,शाखा – कोडोलीच्या 20 व्या वर्धापनदिनी आयोजित केलेल्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. तेव्हा चिटणीस मार्गदर्शन करीत होते.यावेळी संचालक अनिल चिटणीस, सल्लागार चंद्रशेखर बैरागी, शिवनगर विकास समितीचे माजी चेअरमन  विजय कदम, संभाजीनगर ग्रामपंचायत सदस्या प्रियंका अवसरे, संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले व शाखाधिकारी आग्नेश शिंदे मान्यवर उपस्थित होते.

           शिरीष चिटणीस म्हणाले, ” करिअर करण्यासाठी विविध क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून आवडत्या शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडवून जीवन समृद्ध बनवावे.दीपलक्ष्मी पतसंस्था सभासदांची आर्थिक पत सुधारण्यासाठी तसेच त्यांच्या पाल्यांनी मिळवलेल्या विशेष प्राविण्यला दिशा देण्यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असून सातारच्या  संस्कृती ला चालना देण्याचे काम अविरत सुरू आहे. तसेच साहित्याचा वारसा जपला जात आहे.”

        संस्था आपल्या पारदर्शक व अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामामध्ये करत आहे.सर्व बँकिंग सुविधा देत असल्यामुळे समाजाचे हित संस्थेमार्फत  जोपासले जात आहे. संस्थेने नुकतेच 25 वे (रौप्य महोत्सवी वर्ष) पूर्ण केले असून या कालावधीत संस्थेच्या एकूण 50 कोटी ठेवी झालेल्या आहेत. शाखेने 8 कोटी 50 लाखाच्या ठेवी गोळा केल्या असून जवळपास  6 कोटी रुपयाचे कर्जवाटप केले आहे. 2 कोटी 50 लाख रुपये तरल ते पोटी  शहरातील विविध बँकेत गुंतवणूक केली आहे. संस्था आर्थिक क्षेत्राबरोबर  सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असून संस्थेमार्फत  विविध व्याख्याने, चर्चासत्रे, गीत मैफिल, आर्ट गॅलरी  यासारखे  समाजहितास पोषक असणारे  व समाजाला  दिशा देणारे कार्यक्रम संस्था अविरत घेत आहे.

      यावेळी विजय कदम, अधिकराव मोहिते व कुसुम चव्हाण यांनीही सर्व सुविधा मिळत असल्याने आपपल्या मनोगतात पतसंस्थेचे भरभरून कौतुक केले.सदरच्या कार्यक्रमास सुनील  शिंदे,सुधाकर बर्गे, तात्या रिटे,सोपानराव सावंत, सुभाष अवसरे, मच्छिंद्र बोरगे,संदीप कणसे, दिलीप बर्गे, शिवराम चव्हाण,अरविंद भस्मे,अस्मिता कांबळे, लक्ष्मण कदम, विनोद कामतेकर, जनार्धन निपाने, रविराज जाधव, शुभम बल्लाळ तसेच दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळाले विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here