_
_*❂ दिनांक :~ 26 जून 2023 ❂*_
_*❂ वार ~ सोमवार
❂*_
_* आजचे पंचाग
*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*आषाढ. 26 जून*
*तिथी : शु. अष्टमी (सोम)*
*नक्षत्र : उत्तर फाल्गुनी,*
*योग :- वरियान*
*करण : विष्टी*
*सूर्योदय : 05:50, सूर्यास्त : 07:12,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सुविचार
*_
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*संयम, समाधान आणि सहनशीलता असणाऱ्या व्यक्तीत कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*म्हणी व अर्थ
*_
*अति तेथे माती.*
_*अर्थ:-*_
*कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* दिनविशेष
*_
_*या वर्षातील
177 वा दिवस आहे.*_
_* महत्त्वाच्या घटना
*_
*१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.*
*१९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.*
*१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.*
*१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.*
*१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.*
*१९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.*
*२०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.*
_*जन्मदिवस / जयंती*_
*१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.*
*१७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)*
*१८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)*
*१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)*
*१८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)*
*१८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)*
*१९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.*
_*मृत्यू / पुण्यतिथी
*_
*३६३: ३६३ई.पुर्व : रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.*
*१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.*
*१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)*
*१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.*
*२००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)*
*२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सामान्य ज्ञान *_
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले?*
*अमृतसर*
*ICC विश्व टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ कोणत्या देशाने जिंकली?*
*ऑस्ट्रेलिया*
*सध्या सुरू असलेला मराठी महिना कोणता?*
*आषाढ*
*आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात?*
*वर्ण*
*महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली?*
*सुभाषचंद्र बोस*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* बोधकथा *_
_*समाधान*_
*कोणे एके काळी एक अतिशय आनंदाने व समाधानाने जगणारा कावळा होता. एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा हंसाला पाहिले. तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला,” तू किती शुभ्र व सुंदर आहेस. मी मात्र काळा, कुरूप आहे. तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजे.” हंस म्हणाला,” एका पोपटाला पाहीपर्यंत मलाही असेच वाटत होते. पण त्याच्याकडे सुंदर असे दोन रंग आहेत. मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे. तू पोपटाची भेट घे, त्याची ऐट बघ, त्याचे सौंदर्य बघ मग तोच कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल.” हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला. पोपटाला त्याने हंसाप्रमाणे विचारले असता पोपट म्हणाला,” काय सांगू मित्रा! मला हि माझ्या सौंदर्याचा अभिमान होता पण मोरापेक्षा या जगात कुणीच सौंदर्यवान पक्षी नाही. त्याच्याकडे कितीतरी रंग आहेत. तो किती सुंदर आहे.” पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा मोराच्या शोधात निघाला. खूप शोधल्यानंतर एका प्राणीसंग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला. त्याच्याभोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते. कावळा तेथे गेला आणि म्हणाला,” प्रिय मोरा! तू फारच सुंदर आहेस. लोक तुझ्या जवळ येवून तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले हाकलून देतात. मला खात्री आहे कि पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस.” मोर म्हणाला,”मलाहि असेच वाटत होते. मी आनंदी का नसावे? सौंदर्यात माझी तोड नाही, पण हेच सौंदर्य माझ्या दुखा:चे कारण ठरले आहे. मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे. तुझ्यासारख्या कावळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही.ते केंव्हाही मुक्त संचार करू शकतात. त्यामुळे काकराज! तूच या जगातला सर्वात आनंदी पक्षी असावास!”*
*तात्पर्य:-*
*प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याची स्थिती चांगली वाटत असते. हे टाळण्यासाठी आपल्याला स्व-समाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्याठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकेल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
श्री. देशमुख. एस. बी,**सचिव* *प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे .*_
_*7972808064*_
_*सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.*_
_*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर.*_
_*सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक*_
_*समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा संस्थाचालक महामंडळ.*_