तांबखुला ज्याने कवेत घेतले..त्याने मृत्युला जवळ केले!

0

येवल्यात एसएनडी नर्सिंग व पोलिसांच्या वतीने पथनाट्यातून जनजागृती

येवला, प्रतिनिधी :

तांबखुला ज्याने कवेत घेतले..त्याने मृत्युला जवळ घेतले,आज नाही तर आताच सिगरेट करा बेपत्ता,नशा करता है खराब..मिलकर करो इसका बहिष्कार.. असे फलक हातात धरून व घोषणाबाजी करत पतनाट्यातून विद्यार्थ्यांनी अमलीपदार्थ व व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला.अंमली पदार्थ मानवाला मृत्यूकडे घेऊन जातात त्यामुळे त्यापासून दूर राहा असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

शहर पोलीस ठाणे व बाभूळगाव येथील एस.एन.डी.नर्सिंग महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.येथील बसस्थानकावर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी अतिशय आशयसंपन्न पथनाट्य सादर करून तरुण पिढी नशेच्या आहारी चालली असून तरुणाईला नशेच्या विळख्यातून बाहेर येण्याचा संदेश दिला.प्रथम वर्ष व चतुर्थ वर्ष बी. एससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.प्रारंभी शहराच्या विविध भागातून रॅली काढून विविध घोषवाक्य लिहिलेल्या फलकाच्या माध्यमातून अमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजून सांगितले.यावेळी अमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेण्यात आले तसेच उपस्थित नागरिकांनाही शपथ देण्यात आली.

आज समाजात व्यसनाधिनता व अमली पदार्थांचे व्यसन वाढत चालले आहे,त्याचे दुष्परिणाम समाजाला पटवून देण्यासाठी अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला असून या पथनाट्यातून सुंदर संदेश देण्यात आला आहे.आपण स्वतः व आपल्या मुलांना देखील कुठल्याच  व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नका असे आवाहन बोलताना पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी केले.

आजचा विद्यार्थी भावी नागरिक आहे.त्याच्यामध्ये व्यसनांचे दुष्परिणाम पटवून देणे गरजेचे असून हेच काम आमच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केले. समाजाने व्यसनापासून लांब राहण्याची गरज असल्याचे यावेळी नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य जी.जे.नागराज यांनी केले.

पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, चंद्रकांत निर्मळ,सचिन राऊत, मधुकर गेठे,थोरात,गणेश सांगळे सचिन खैरनार तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे शिवानी जगताप, पूजा डोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here