सातारा/अनिल वीर : पावसाचा आगार असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पाऊस सुरू झाला आहे. तरीही शिवसागरमधील जल साठ्यात हळूहळू वाढ होत असली तरी अजुन कोरडेच पात्र आढळुन येत आहे.
कोयना धरणामुळे राज्यास वीज मिळते.शिवाय,कृष्णा नदीमध्येही कोयनेचेच अधिकचे पाणी असते.आतातरी जलाशय कोरड्या स्वरूपात आढळून येत असला तरी १०० टक्के नक्कीच पाणी साठा राहील.कारण, जिल्ह्यात पाऊस कमी-जास्त झाला तरी महाबळेश्वर तालुक्यात पूर्ण क्षमतेने पाऊस पडत असतो. आतापर्यंत दरवर्षीच कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरत असते.