पालिकेने गटर काम पूर्ण केले नाहीतर दि.२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण ! 

0

सातारा/अनिल वीर : आरसीसी गटर बांधकाम करण्यासाठी पालिकेने साहित्य आणलेले आहे. तेव्हा लवकरात लवकर पूर्ण करावे.अन्यथा,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२४ पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे.

    रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अजिनाथ केवटे यांनी म्हसवड पालिकेसमोर गेले २२ दिवस आंदोलन पूर्ण केल्यानंतर पालिकेने सदरचे काम पूर्ण करू.असे लेखी पत्र केवटे यांना दिले आहे.त्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे.यासंबंधी सविस्तर वृत्त असे, नगरपरिषद म्हसवड यांनी चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी या दरम्यान अर्धवट गटारबाबत आंदोलन रिपब्लिकन सेनेतर्फे सुरू केले होते.मुख्याधिकारी डॉ.सचिन माने व संबंधित प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा करण्यात आली होती.त्याचाच परिपाक म्हणून पाईप व इतर साहित्य आणलेले आहे.सदरच्या आंदोलनास रिपब्लिकन सेनेचे प.अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,कोरेगाव तालुकाध्यक्ष सतीश माने,संजय कवी, समाधान गाडेकर,श्रीरंग वाघमारे, बजरंग वाघमरे,स्वप्निल भोकरे, नितीन वाघमारे,भारत चव्हाण, विष्णू लिंगे,विष्णू जाधव,रघुनाथ कवी, प्रमोद लोखंडे ( दलित पॅंथ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), महेश लोखंडे (आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष), एच.बनसोडे, महादेव सरतापे, अंगुली बनसोडे,अनिल वीर, सुनील कदम (वडी) आदीनी भेटी देऊन पाठींबा दिला होता.२२ दिवसांमध्ये केवटे यांनी गाढवाची आरोळी, थाळी नाद, सत्यनारायण पूजा, मौन धारण, बोंबाबोंब, घंटानाद, उड्या मारणे,अंत्ययात्रा,अंधा कानून म्हणून डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदोलन आदी प्रकाराने प्रत्येक दिवशी आंदोलन छेडल्याने जिल्ह्यात चर्चा होती. शिवाय, जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही.अशीही ठाम भूमिकाही अजिनाथ केवटे यांनी घेतली होती. म्हसवड नगरपलिका हद्दीत चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी या दरम्यान गटार झालेले नव्हते. या कामाबाबत मात्र बऱ्याच वेळा टेंडर काढली होती. मात्र,कामाचा पत्ताच नव्हता. त्यामुळेच केवटे यांनी लढा उभारला होता. गटाराची सोय नसल्याने खड्डे पडलेली आहेत. त्यामुळे सांडपाणी, संडासचे पाणी, पावसाचे पाणी, अंघोळीचे पाणी एकत्रित होत आहे. त्याच पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे वॉल (पाईप) आहेत. सरळ सरळ हेच दुर्गंधीचे पाणी वॉलमध्ये जात आहे. तो बॉल या घाण पाण्यामध्ये १ फुट खोलीवर आहे. हे घाण पाणी वॉलमध्ये गेल्याने परिसरातील लोकांना घाण पाणी प्यावे लागत आहे.या भागामध्ये डासाचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे रोगरोई मोठया प्रमाणात पसरत आहे.त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.तरीही याकडे  मुख्याधिकारी म्हसवड नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. असा हल्लाबोल करीत गेले २२ दिवस वेगवेगळ्या प्रकारे हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून अंदोलन करीत होते.त्यामुळे अधिकृतपणे केवटे यांना लेखी पत्र दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here