एक दिवसीय आंदोलन करूनही न्याय न मिळाल्याने पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू !

0

सातारा/अनिल वीर : भीमनगर-दरे गावातील पुणे-मिरज रेल्वे लाईनमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा.म्हणून एक दिवसीय आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही.म्हणूनच पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनास सुरू करण्यात आले आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे.यावेळी सरपंच सुरेश कांबळे, सखाराम ससाणे, नारायण लोखंडे, राजाराम कांबळे, विनय कांबळे, अजित लोखंडे, राजेंद्र कांबळे, सचिन कांबळे, सूर्यकांत उबाळं, संतोष उबाळे,विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,पत्रकार आदी उपस्थित होते.दि.१. ०२-०२-२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.भीमनगर-दरे गावातील पुणे-मिरज रेल्वे लाईनमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याबद्दल दि.२३-०२-२०२३ रोजी एकदिवशीय लक्षणीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. नवीन पुणे-मिरज रेल्वे लाईनचे सध्या काम चालू आहे. त्यामध्ये भीमनगर-दरे गावातील ३५ खातेदार यांच्या शासनाकडून मिळालेल्या पूनर्वसित शेतजमिनी सदर रेल्वे लाईनमध्ये गेलेल्या आहेत. तसेच भीमनगर स्मशानभूमी १७ गुंठे व दरे स्मशानभूमी १७ गुंठे अशी एकूण स्मशानभूमीतील ३० गुंठे जमीन रेल्वे लाईनमध्ये गेलेली आहे. सदरच्या ग्रामस्थांना जमीन अथवा आर्थिक मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. भीमनगर-दरे गावातील शेतकरी यांच्या शेतजमीन रेल्वे लाईनमध्ये गेलेली आहे. त्या मोबदल्यात जमीन अथवा आर्थिक मोबदला मिळालेला नाही. याबाबत संबंधितांना वारंवार निवेदन दिली.शिवाय,पत्रव्यवहार करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे भीमनगर-दरे गावातील २५ कुटुंबासोबत अमरण उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू करण्यात आले असून जमीन अथवा आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे. जर उपोषण करूनही न्याय मिळाला नाही तर भीमनगर –  दरे गावातील ३५ कुटुंबासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करू.असाही गर्भित इशारा दिला देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here