सातारा : जकातवाडी,शेंद्रे,शहापूर आदी ठिकाणी सातारा शहरासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दि.१९ रोजी करण्यात आले आहे.
रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांचा ५६ वा वाढदीवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८ वा.औक्षण,९ वा. शेंद्रे येथे वृक्षारोपन तदनंतर आंगणवाडीमध्ये खाऊ वाटप, १०.३० वा.पंचशील निवास, जकातवाडी येथील निवासस्थानी वर्षावास व भिम गीतांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. दुपारी १ वा. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी पदाधीकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून अभिष्टचिंतनपर सोहळा होणार आहे.शहापुर येथे खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.तेव्हा संबंधितांनी ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.याकामी वंचित संघर्ष मोर्चाचे सुधाकर काकडे, दादासाहेब केंगार,सुनील निकाळजे,वसंत गंगावणे,श्रीरंग वाघमारे (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,शेंद्रे),शहापुरचे उपसरपंच राजेंद्र सकटे आदी मान्यवर-कार्यकर्ते अथक असे परिश्रम घेत आहेत.