शिखर शिंगणापूर येथून शंभू महादेवाच्या दर्शनाने बीआरएसच्या प्रसाराला माणमध्ये सुरुवात
गोंदवले – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव प्रणित भारत राष्ट्र समितीच्या माण तालुकाध्यक्षपदी दादासाहेब गोरड यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि माण तालुक्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिखर शिंगणापूर येथून बीआरएसच्या माणमधील नव्या पर्वाला यावेळी सुरुवात झाली. प्रचार आणि प्रसाराचा नारळही यावेळी शंभू महादेवाच्या साक्षीने फोडण्यात आला. तसेच शंभू महादेवास दादासाहेब गोरड यांनी कार्यकर्त्यांसह अभिषेक केला.
यावेळी राष्ट्रीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप खरात, बाबासाहेब भोसले, डॉ.वसंत खरात, सागर शिरकुळे, यशराज खरात,बाळासाहेब हांडे, करण हांडे, भाऊसाहेब सुळे,प्रतीक ओंबासे ,सचिन सावंत,दादासाहेब चव्हाण ,बाबासो खांडे, रमेश रणपिसे, राहुल भिसे, शरद ओंबासे,प्रदीप साळुंखे, महेश कदम,नानासो रुपनवर, दाजीराम मोरे ,सुभाष निकम, महेश अवघडे, सुभाष अवघडे, सुनील माने, रमेश वीरकर, शहाजी माने, विठ्ठल दडस, समाधान चौगुले, रुपेश क्षीरसागर, इत्यादी मान्यवर आणि बीआरएसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
केसीआर यांनी तेलंगणात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यातच भर पडली ती महाराष्ट्रात होत असलेले राजकीय स्फोट आणि लोकांचा राजकारणी आणि राजकारणावरील उडत चाललेल्या विश्वासाची. याचा फायदा घेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील २८८विधानसभा मतदारसंघावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्याचा निर्धार केला आहे.
त्याचबरोबर दलित, आदिवासी, ओबीसी, शोषित, वंचित, पीडित, अल्पसंख्यांक, विद्यार्थी, युवक तसेच महिलांच्या प्रश्नावर भर देत सोडवण्याला जास्त प्राधान्य दिले. यामुळे महाराष्ट्रातील अधिक लोक या पक्षाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीआरएस पदाधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रभर निवडी सुरू आहेत.
प्रतिक्रिया :
शंभू महादेवाच्या साक्षीने बीआरएसच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात करत आहोत. शंभू महादेवाकडे ‘ईडा पीडा टळू दे,बळीच राज्य येऊ दे तसेच महाराष्ट्रातील शेतकरी राजाला चांगले दिवस येऊ दे’ म्हणून साकडे घातले आहे.. शंभू महादेव मला कार्य करताना बळ देईलच. मी बीआरएस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर अधिक भर देणार आहे.
–—– दादासाहेब गोरड,
माण तालुका अध्यक्ष, भारत राष्ट्र समिती