सातारा/अनिल वीर : एस.टी. स्टॅण्ड,म्हसवड येथील अर्धवट काम सुरू करावे.या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते.रिपब्लिकन सेनेचे माण तालुकाध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी आंदोलन दि.१४ ऑगस्टला सुरू केले होते.त्यांना नागरिकांचा पाठींबाही मिळत होता. सर्वपक्षीय रास्ता रोकोही झाला.तरीही न्याय मिळत नसल्याने आंदोलन थांबायचे नाव घेत नाही.
वाहतूक नियंत्रक विश्वास माने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. म्हसवडमधील असलेले एस.टी स्टैंडचे अर्धवट बांधकाम असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.हा त्रास होत असल्याने केवटे यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलेले आहे. सकाळी १० ते ५ वाजेपर्यत दररोज एस.टी. स्टॅंडमधुन तसेच समोरील रस्त्यावरून एकही एस.टी कोणत्याही मार्गावरून जाऊ देणार नाही.असे निवेदनात स्पष्ट केलेले होते.म्हसवडचे एस.टी स्टँड हे सिध्दनाथाच्या पावन नगरीतले आहे. या कुलस्वामीला महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक अशा आनेक राज्यातून भाविक येत असतात. तसेच यात प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. उन्हाळा, पावसाळ्यात शाळेत येणारे विद्यार्थी – विद्यार्थीनीना व इतर प्रवाशांना चिखलाचा, गटारीचे पाणी अशा दुर्गंधी वासामुळे सर्व प्रवाशांचे खुप मोठया प्रमाणावर हाल व त्याची संपुर्ण गैरसोय होत आहे. गरीब प्रवाशांना रात्रीच्यावेळी गावी जाण्यास एस. टी नसल्यास त्यांचे फार मोठे हाल होत आहे. लवकरात लवकर अर्धवट असलेल्या बांधकामास सुरवात करावी.आंदोलनाच्या वेळेत कोणीही एस.टी.बसची तोड-फोड केल्यास मी जिम्मेदार नसणार आहे.त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील.जो पर्यंत बांधकामास सुरवात होत नाही. तोपर्यंत मी अंदोलन सोडणार नाही.असेही केवटे यांनी म्हटले आहे.सदरच्या निवेदनाच्या प्रती मॅनेजिंग डायरेक्टरसाो.मुंबई, वाहतूक नियंत्रक, म्हसवड बस स्थानक,म्हसवड,सहाय्यक पोलीस निरिक्षक व म्हसवड पोलीस स्टेशन म्हसवड यांना देण्यात आलेल्या होत्या. रास्तारोको प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,बजरंग वाघमारे,भारत नरळे,प्रमोद लोखंडे,सचिन माने,सनी तुपे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी,प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.जो पर्यंत बांधकामासाठी लागणारे साहित्य जागेवर येऊन कामाला सुरुवात होत नाही.तो पर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा निर्धार केवटे यांनी व्यक्त केला आहे.