सातारा/अनिल वीर : पाटण तालुक्यातील मालोशी व आवर्डे या गावी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालेले आहेत.
तारळे विभाग बौध्द विकास सेवा संस्था व भारतीय बौध्द महासभा, शाखा – तारळे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम मालोशी, ता. पाटण येथे मधुकर (आण्णा) जगधनी यांनी धम्म संगिनी फलीत या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी राहुल रोकडे, राजेंद्र सावंत,विजय भंडारे,बौध्दाचार्य निलेश कांबळे, अमर कांबळे, समाधान कांबळे, राकेश कांबळे, सुरज कांबळे, रत्नाकर कांबळे, संजय कांबळे, चंद्रकांत कांबळे, सदाशिव जाधव,मारुती कांबळे, लक्ष्मी कांबळे,सखुबाई कांबळे, शालन जाधव, उपासक व उपासिका बहुसंखेने उपस्थित होत्या.
आवर्डे, ता.पाटण येथे झालेल्या वर्षावास कार्यक्रमात बौद्ध धम्मातील सण आणि मंगल दिन या विषयावर मुख्याध्यापक विजय भंडारे यांनी मार्गदर्शन करून वही-पेन वाटप केले. यावेळी राहुल रोकडे, भानुदास सावंत, विजय आ.भंडारे, बौध्दाचार्य राजेंद्र सावंत, भिमराव सप्रे, मधुकर जगधनी, आप्पासाहेब भंडारे, धनाजी कांबळे, आदित्य कांबळे, किशोर धरपडे, साहील जगदाळे,राजाराम भंडारे, आनंदा भंडारे, बौध्दाचार्य विजय भंडारे,माजी सैनिक सुनिल भंडारे, काशिनाथ भंडारे,श्रीकृण्ण भंडारे, राजु भंडारे,रामचंद्र भंडारे, विष्णु भंडारे, विलास भंडारे, स्वनिल भंडारे,वैभव भंडारे, कुणाल भंडारे, विभागातील व सिद्धार्थ मित्र मंडळातील उपासक-उपासिका उपस्थित होत्या .