सातारा : गतवर्षीपासून प्रतापसिंह हायस्कुलपासुन जी संविधान रॅलीस प्रारंभ होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप होत आहे.तेव्हा यापुढेही दरवर्षीच निरंतर रॅली समाजकल्याण, एमएसडब्ल्यू,प्रतापसिंह हायस्कुल व संविधानप्रेमी यांच्यावतीने निघणार असल्याचे स्पष्ट संकेत सहआयुक्त नितीन उबाळे यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संविधान दिन म्हणून मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. प्रारंभी,राजावाडा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रास्ताविकेचे वाचन शाळा व पुतळ्याजवळ करण्यात आले. प्रांगणामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संविधान रॅलीची सुरुवात होवून रॅलीची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा,नगरपरिषद चौक येथे करण्यात आली. संविधान रॅलीमध्ये पालखीचाही समावेश असल्याने सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते. नागरीकांनी सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, एमएसडब्ल्यू कॉलेजचे प्राध्यापक,प्रतापसिंह हायस्कुलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने, कांबळेसर,शिक्षकवृंद,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,मिलिंद कांबळे, नागरिक व संविधानप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.