सातारा/अनिल वीर : संविधान दिनानिमित्त येथील आकाशवाणी व मतकर झोपडपट्टी वसाहतमधील दोन्ही संविधान गटातील महिला व परिसरातील नागरिकांच्यासाठी आयोजित संविधान माझा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बाल कल्याण समितीच्या अॅड सुचित्रा घोगरे-काटकर यानी,” महिला अधिकार” या विषयी मार्गदर्शन केले. गणेश वाघमारे यानी आपल्या जगण्यातील संविधानाचे महत्त्व समजून सांगितले. यामध्ये मूलभूत अधिकार,महिला व बालकांचे कायदे, बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान संबंध याविषयी सविस्तर मांडणी केली.
याकामी,तारा दबडे, कमल हराळे, रेखा अवघडे, ममता पवार, शोभा बाबर, सौ. कुचेकरताई, प्रथमेश माने , चेतन आडागळे, अक्षय साळवे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.