जालना मध्ये माजीमंत्री राजेश टोपे यांच्या गाडीच्या अज्ञाताने काचा फोडल्या

0

सुदाम गाडेकर , जालना :

जालना मध्ये Jalna आज राष्ट्रवादीचे घनसावंगीचे आमदार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे Former minister Rajesh Tope यांच्या कारवर दगडफेककरण्यात आल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या अनुषंगाने आमदार राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. यावेळी राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या परिसरात उभी असताना अज्ञाताने त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली.

या दगडफेकीमुळे कारच्या समोरील भागांचे नुकसान झाले आहे. तसेच घटनास्थळी ऑईलने भरलेली एक बॉटल देखील दिसून येत असल्याने हा घातपाताचा प्रकार नाही ना, असा संशय व्यक्त होतो आहे. या घटनेनंतर आपले काम आटोपून राजेश टोपे दुसऱ्या गाडीने निघून गेले आहेत.या तोडफोडीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here