चोरीचा बनावा करणारे चार आरोपी अटक व 1लाख 4 हजार रुपये हस्तगत

0

भुईंज पोलिसांची दमदार कारवाई

पंकज कदम पुसेगाव प्रतिनिधी : मेडिकल औषधाची विक्री करून  1 लाख 4 हजार 575 रुपयांची चोरी झाल्याचा बनाव faked theft करणारे चार तासात चार आरोपी भुईंज पोलिसांच्या ताब्यात .

  दिनांक 30 11 2024 रोजी फिर्यादी यांच्या साक्षीदार राहुल अंकुश गोरे व मयूर आनंदराव किर्दत, यांच्यासोबत मेडिकल औषधाच्या बॉक्सची विक्री करून मिळालेले एक लाख चार हजार 575 रुपये एका ग्रे रंगाच्या बॅग मध्ये ठेवले होते. ही बॅग महिंद्रा सुप्रो टेम्पो यांच्या मालकीचा असून त्याचा नंबर 93 75 असून वाई ते पाचवड मार्गे जात असताना मौजे असले कुंभारवाडी तालुका वाई गावचे हद्दीत आल्यानंतर फिर्यादी यांच्या गाडीतील साथीदारासह टॉयलेटला लागली आहे. असा बहाना करून दारूच्या दुकानातून विकत घेतलेली दारू पिण्यासाठी टेम्पो रोडच्या कडेला उभा करून लॉक केला होता. थोड्याच वेळाने ते तिघेही परत माघारी आले असता त्यांना टेम्पोच्या डाव्या बाजूची काच फोडलेली दिसली व टेम्पोतील पैशाची बॅग चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर या चोरीची फिर्याद भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. 

सदर गुन्हा उघड करण्याबाबत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनी रमेश गर्जे यांनी स्टाफ सह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता फिर्यादी व त्यांचे साथीदार यांच्याकडे सदर घटनेची प्रकाराबाबत सखोल चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फिर्यादी बाबत असलेले त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोरे व मयूर आनंदराव कीर्दत त्यांनी त्यांच्या सातारा येथील इतर दोन साथीदार ओमकार रमेश गोळे ,अभिजीत अंकुश गोळे. यांच्यासोबत संगमत करून गुन्ह्याचा कट रचून फिर्यादीला शेतामध्ये पुढे पाठवून पाठीमागे सदर पैशाची बॅग त्यांचे साथीदाराकडे देऊन  गाडीची काच फोडून चोरीचा बणावा केल्याचे सांगितले त्याप्रमाणे सातारा येथील त्यांचे साथीदार यांना देखील लगेच ताब्यात घेऊन चारही आरोपींना अटक करून त्यांची न्यायालयाकडून दोन दिवस पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून गुन्हातील  चोरीस गेलेले 1लाख 4 हजार 575 रुपये  असलेली बॅग हस्तगत करण्यात आलेली आहे.

हा गुन्हा चार तासांमध्ये उघड झाल्याने भुईज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी रमेश गर्जे ,पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे ,पोलीस फौजदार अवघडे ,राजे ,नितीन जाधव, राजाराम माने, सुहास कांबळे, सुशांत धुमाळ, रविराज वर्णेकर ,सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते ,किरण निंबाळकर, पोलीस कर्मचाऱ्यांचे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनी या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here