‘
सातारा/अनिल वीर : सत्यशोधक या सिनेमाद्वारे म.ज्योतिबा फुले यांचे कृतीयुक्त विचार बहुजन रसिकांना मिळणार आहेत.
म.ज्योतिबा फुले यांनी केवळ विचारच दिला नाही. तर विचारांची क्रांती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्वातंत्र्य लढयाची बिजे पेरली गेली शिक्षणाची व स्त्री मुक्तीची. शेतकऱ्यांवर अन्यायाची चळवळ त्यांनी उभी केली. अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर सत्यशोधक हा चित्रपट दि. ५ जानेवारीला येऊ घातलेला आहे. याचा पहिला शो एक उत्सव म्हणून साजरा करुयात. घराघरापर्यंत म. ज्योतिबा फुलेंचा इतिहास पोहचवूया.असा सुर विचारमंथन बैठकीत मान्यवरांनी उपस्थित केला. शिक्षक बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक सिनेमाच्या ट्रीझर लाँच व विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक बैंकचे चेअरमन राजेंद्र बोराटे,निर्माते बोराडे,शंकरराव मुजबळ, दीपक भुजबळ, निर्माते शिवा बागूल आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रकाश फरांदे यांनी म.फुले व छ. शिवराय यांच्या जीवनावर पोवाडे सादर केले. यावेळी संजय परदेशी, दीपक भुजबळ, राजेंद्र बोराटे यांच्यासह मान्यवरांनी आपली मते मांडली.सदरच्या कार्यक्रमास बहुजन समाजातील मान्यवर,विविध संघटनांचे पदाधिकारी व सिनेरसिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
दिग्दर्शक बागूल म्हणाले,”म. ज्योतिबा फुले यांनी छ.शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. छ.शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडाही त्यांनीच लिहला होता. महिलांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिक्षण दिले. सत्यशोधक जीवन जगणा-या या म. फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आजपर्यंत एकही चित्रपट नव्हता. एखदा प्रयत्न झाला होता. परंतु तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे म.फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा आम्ही विचार करत होतो. दहा वर्षाच्या अथक परिश्रमातून हा विचार पुढे आला. पाच वर्ष चित्रपट निर्मितीला गेली सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्च आला आहे. महापुरुषांचा चित्रपट हा महानच असायला हवा.म्हणून आमचा प्रयत्न झाला आहे.” हा चित्रपट दि ५ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाला तीन आतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.