गोंदवले – भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा यांच्यामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून शासनाकडे नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम मारुती मंदिर गोंदवले खुर्द या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या तपासणी अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगार, त्याची पत्नी व दहा वर्षापेक्षा मोठी दोन मुले यांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये २४ पेक्षा जास्त प्रकारच्या (डेंगू, मलेरिया, टायफाईड, एचआयव्ही व रक्तातील इतर सर्व घटक) आरोग्य तपासण्या केल्या जातात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हाध्यक्ष श्री शामराव गोळे, जनरल सेक्रेटरी श्री रविंद्र माने, बांधकाम जिल्हाप्रमुख श्री विनोदजी केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आला यामध्ये बांधकाम कामगार व इतर कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुख, सुविधा, योजना व लाभ याबाबत माहिती देण्यात आली तसेच बांधकाम कामगारांनी नोंदित होण्याचे आव्हान करण्यात आले. याप्रसंगी माण तालुका प्रतिनिधी सौ रेश्मा शिलवंत, सौ अस्मिता तुपे , संगीता चव्हाण,नाना देवकर व पिंगळी, लोधावडे, काळेवाडी, दहिवडी, गोंदवले, शिंगणापुर,वावरहिरे,कोकरेवाडी,वडुज,कुरवली, मांडवे, तडवळे,देवापुर,वारुगड या ठिकाणचे बांधकाम कामगार उपस्थित होते उपस्थितांचे आभार सौ रेश्मा शिलवंत,सौ अस्मिता तुपे यांनी मानले