सातारा : तारळे भागाचा छावा म्हणून राहुल रोकडे समाजकारणात कार्यरत आहेत.त्यांची शैक्षणिक,धार्मिक व राजकीय काम करण्याची हातोटी आहे.तेव्हा युवकांनी राजकारणात यश संपादन करण्यासाठी वक्तृत्व कला अवगत करावी.असे आवाहन सोसायटीचे चेअरमन माजी केंद्रप्रमुख राजाराम भंडारे यांनी केले.
तारळे विभागीय युवा नेते राहूल रोकडे यांचा जाहीर सत्कार राहुडे,ता.पाटण येथे करण्यात आला.तेव्हा राजाराम भंडारे मार्गदर्शन करीत होते.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गौरवशाली मनोगत व्यक्त केली. तारळे भागाचे दमदार युवा नेतृत्व,बौद्ध विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल सुदाम रोकडे यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने भारतीय बौद्ध महासभा तारळे विभाग व बौद्ध विकास सेवा संस्था,तारळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार सोहळ्यास सर्व पदाधिकारी, युवा मित्रमंडळी, सर्व धम्म बंधु-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे (पाटण), आबासाहेब दणाने(सातारा), नंदकुमार भोळे,रुपेश सावन्त,श्री व सौ.मिलिंद (बापू) कांबळे,सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,बौद्धाचार्य,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले,राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड. विलास वहागावकर,आरपीआय पाश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा.रवींद्र सोनवले,तालुकाध्यक्ष प्राणलाल माने,आनंदराव कांबळे,वंचितचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, रेखाताई जाधव, बाळासाहेब जगताप,आत्माराम कांबळे, कार्यकर्ते आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, कार्यकर्ते, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. राहुल रोकडे यांचा अनेक मान्यवरांनी भेटवस्तु,पुस्तक,शाल,पुष्पगुच्छ, पुष्पहार आदी प्रकाराने सत्कार केला.मुख्याध्यापक सुनील माने यांनी सूत्रसंचालन केले. याकामी, भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष भानुदास सावन्त,सुदाम रोकडे,राजेंद्र सावन्त,गौतम माने,जगदणी आण्णा आदी मान्यवरांच्या मार्गदर्शननाखाली कार्यकर्त्यानी अथक असे परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी सर्वानी मिष्टान्न भोजनांचा आस्वाद घेतला.