भाविकांची उपस्थिती, विधिवत पूजनानंतर पवित्र रंजन भरण्यास सुरू.
पैठण,दिं.२७.(प्रतिनिधी) : आवडीने हरी कावडीने पाणी भरी.श्री संत तुकाराम महाराज बीज आणि शांतिब्रम्ह श्रीमंत संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे ४२५ वे वर्ष या नाथषष्टी उत्सवाची सुरुवात नाथांच्या वाड्यातील श्रीखंडया रूपात भगवान पांडुरंगाने पाणी भरलेल्या रांजणाची विधीवत पुजा नाथवंशज सालकरी ह. भ. प. रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले यांच्या हस्ते संपन्न झाली. या पूजेचे पौरोहित्य वे. शा. सं. चंद्रशेखर उपाध्ये आणि वे. शा. सं. रविंद्र गुरु साळजोशी, उत्तम गुरु सेवनकर, पोपट गुरु, प्रकाश नाईक,यांनी केले. रांजणात मानाची पहिली घागर सौ उल्का रघुनाथबुवा पालखीवाले यांनी टाकली.याप्रसंगी ज्ञानेशबुवा पालखीवाले, योगेश महाराज पालखीवाले, रविंद्र पांडव, श्रीकृष्ण कुलकर्णी, अथर्व पांडव, अॅड चंद्रशेखर कुलकर्णी, अॅड अनिल जोशी, दिनेश पारीख,रेखाताई कुलकर्णी, ऐश्वर्या पालखीवाले, अपूर्वा पालखीवाले, माधुरी पांडव सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जो रांजण भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंडाच्या रूपाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरला होता. त्या पवित्र रांजनाची विधिवत पूजा करून त्यात पाणी भरण्यास आज बुधवार पासून सुरुवात झाली. रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सव औपचारिक रित्या प्रारंभ होतो. हा रांजण ज्या दिवशी भरतो. त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात. अशी शेकडो वर्षाची वारकऱ्यांची धारण आहे. तुकाराम बिजेच्या मुहूर्तावर नाथवंशज यांच्या हस्ते पवित्र रांजणाची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर बुधवारी भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला. भगवान श्रीकृष्ण कोणाच्याही रूपात उपस्थित राहतात असे मानले जाते. ज्या व्यक्तीच्या हातून रांजण भरला जातो. त्यास भगवान श्रीकृष्ण म्हणून त्या व्यक्तीस शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्याचा नाथ वंशजाच्या वतीने सन्मान केला जातो.