जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा …

0

सातारा : शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत बोजवारा उडालेला आहे.तो सुरळीत करावा.अशी मागणी जिल्हाधिकारी व संबंधितांना शहीद भगतसिंग मित्र मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

  सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये पुरेशी एस. टी. आणि बस सेवा नियमित नसल्याने प्रवासी वर्गाना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे.सरकारी वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेक महिला, वृद्ध, विद्यार्थी वर्ग उन्हातान्हात अनेक किलोमीटर पायी चालत प्रवास करीत आहेत. संध्याकाळनंतर तर  वाहतूकीचे साधन नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.तेव्हा ग्रामीण भागात दर अर्ध्या तासाने नियमित एस. टी. आणि शहरात बस सेवा सुरु करावी. साता-यात असणाऱ्या भुयारी मार्गातून विद्यार्थी व इतर जनतेचे येणे जाने चालू असते. हेसुद्धा धोकादायक वास्तव आहे. यावर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. निवडणूक आचारसंहिता सुरु असली तरीही लोकांचे प्रश्न महत्वाचे असल्याने गांभीर्याने विचार होऊन त्वरित निर्णय घ्यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी कॉ. किरण माने,सलीम आतार, वसंत नलावडे,विनायक आफळे,परवेज सय्यद,शिरीष जंगम,प्रकाश खटावकर,युसूफ इनामदार,संजय भोसले,दत्ता राऊत,अनिल वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here