सातारा/अनिल वीर :- देशात चालू आसलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलण्यासाठीच ४०० पार चा नारा भाजप व मित्र पक्ष देत असल्याचे बोलले जात आहे. त्यास रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त आंबेडकर कुटुंबियामध्येच असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकात खंडाईत यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार प्रशांत कदम यांना रिपब्लिकन सेना,भारतीय बौद्ध महासभा व माजी सैनीक संघटना यांनी जाहीर पाठींबा देण्यात आला. तेव्हा येथील डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सहविचार सभा संपन्न झाली.तेव्हा खंडाईत मार्गदर्शन करीत होते.
“या देशात मोदींच्या रूपाने येऊ घातलेली एकाधिकारशाही आणि संविधान व लोकशाही मोडीत काढण्याचे कारस्थान चालू आहे. हे सर्व थांबवण्याची ताकद महाविकास आघाडीकडेच असल्याचा आभास निर्माण करून वंचित आघाडी भाजपलाच मदत करत असल्याची टीका करण्यात येत आहे. याला सडेतोड उत्तर वंचित आघाडीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिन्ही नातू एकत्रितपणे येऊन देत आहेत. जे पक्ष ईडीला घाबरून फुटतात आणि कधीकाळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपला बरोबर घेऊन सत्ता उपभोगतात. ते उद्या निवडून आल्यानंतर सत्तेसाठी त्यांच्या बरोबर जाणार नाहीत याची काय गँरंटी काय ? अशीच मते सर्वसामान्य वंचित समुहातील जनतेची आहेत. सत्ता मात्र मोजक्या कुटूंबाचीच हे चालणार नाही. हे ठासून सांगण्याची आणि संविधान व लोकशाही ही वंचित समुहाच्या ताकदीवर रोखण्याची ताकत आंबेडकरी कुटूंबातच असल्याचेही खंडाईत यांनी सांगीतले.
“७० वर्षे वंचित समुहांच्या मताची लुट करून हाताच्या बोटावर मोजता येईल. येवढ्याच कुटूंबाकडे सत्ता असल्याने त्यांचाच मोठा विकास झाला आहे. सर्वसामान्य मतदार मात्र वंचितच राहिला आहे.त्याला मोफत अन्नसुरक्षेवर आणले आणि डिजीटल इंडियाचे गाजर दाखवून एकाधिकारशाही लादली आहे.आता वंचित समुहामध्ये जनजागृती करून लोकशाही ही सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे सांगून त्यांच्यात आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून त्यांनाच त्यांच्यातील ताकदीचा आंदज सांगून सत्तेतील मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम वंचितचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणी डॉ.ऍड.भिमराव आंबेडकर या त्रिरत्नांच्या माध्यमातून चालू आहे. त्याचाच धस्का घेऊन त्याच्यावर मतविभागनीचा आरोप केला जात आहे.यावर विश्वास न ठेवता सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा निसंकोचपणे प्रचार करून एकाधिकारशाहील मोडीत काढून संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी सर्व वंचीतांना वंचितांनीच सत्तेत बसवले पाहिजे. त्यासाठी अपप्रचाराला बळी न पडता मिळेल त्या साधनांनचा वापर करून व्यक्ती यांना प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी काम करावे.त्यासाठीच रिपब्लीकन सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते वंचितच्या उमेदवारास पाठिंबा देउन तन मन धनाने सहकार्य करतील.असा विश्वास वंचितचे उमेदवार प्रशांत कदम यांनी व्यक्त केला.
प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, बाळासाहेब जगताप, सचिन कांबळे,ऍड. विजयानंद कांबळे, भागवत भोसले,सुनिल कदम, दादासाहेब केंगार, दादासाहेब कांबळे, आबासाहेब दणाने, नितीन रोकडे,बजरंग वाघमारे, सुधाकर देवकांत, दादासाहेब खुंटे, मिलिंद सावंत, बाळासाहेब सावंत,नितीन भोसले,श्रीरंग वाघमारे,प्रशांत कांबळे,सचिन कांबळे,सतीश माने,विजय मोरे, शशीकांत खरात,वसंत गंगावणे, वामन गंगावणे,बाळासाहेब कांबळे, सतीश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.