शाळेतील गॅदरिंगमध्येच अत्याचार; शाळकरी मुलगी गरोदर

0

सातारा : शाळेतील गॅदरिंग पाहण्यास गेलेल्या मुलीला भोवळ आली. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर अत्याचार केला. त्यातून संबंधित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी अज्ञातावर बोरगाव पोलिस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोअंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावामधील शाळेत नोव्हेंबर २०२३ मध्ये गॅदरिंग होते. हे गॅदरिंग पाहण्यासाठी १५ वर्षांची मुलगी मैत्रिणीसोबत गेली होती. त्यावेळी पीडित मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध झाली. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी संबंधित पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला डाॅक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.

घरातल्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने नोव्हेंबर महिन्यात बेतलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर मुलीच्या आईने शनिवार, दि. १५ रोजी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील या अधिक तपास करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here