पार्वतीपुर पार: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातून गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीरपणे गोवंश वाहतूक करणाऱ्या किरण चव्हाण या इसमाला तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे.
याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाबळेश्वर आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाबळेश्वर तालुक्यातील गो रक्षक कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलावडे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने गेल्या काही वर्षांपासून गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला आहे. मात्र, या कायद्याचे उल्लंघन करून किरण चव्हाण हा महाबळेश्वर तालुक्यातून गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करत आहे.
यापूर्वीही किरण चव्हाण याच्यावर गोवंश वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी श्री. भरत साठे यांच्या खून प्रकरणातही त्याचे नाव होते.किरण चव्हाण याच्या कृत्यांमुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे त्याला तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देण्याच्यावेळी शिवप्रतिष्ठानचे श्री. संजुबाबा ओंबळे, श्री. सनी मोरे, श्री. ओंकार पवार, श्री. विजय भाऊ नायङु, श्री. आनंद शिंदे,श्री. अविष्कार केळगणे, श्री. मंगेश नाविलकर,श्री किरण ढेबे,श्री निलेश ङोईफोङे,श्री विनय गायकवाड आणि श्री. बाळासाहेब पांचाळ यासह अनेक गो रक्षक आणि विविध पक्षसंघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.