सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे आगाशीव लेणी कराड येथून रविवार दि.२१ पासून वर्षावास मालिकेस सुरुवात होणार आहे.
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकेची सुरुवात करण्यासंबंधी महाविहार येथे दि.२१ रोजी सकाळी १०।। वा.जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सहविचार झाल्यानंतर दुपारी १ वा.आगावशिव लेणी येथे वर्षावासाचा औपचारिक प्रारंभ करण्यात येणार आहे.राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या लेणी संवर्धन मोहीमेअंतर्गत आगाशिव लेणी येथून वर्षावास मालिकेस सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वर्षावास मालिकेस मार्गदर्शन करण्यासाठी माजी राष्ट्रीय सचिव नाथा ममता आगाणे (काका), माजी जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे, माजी जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे तसेच जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तेव्हा जिल्ह्यातील महाबळेश्वर,वाई, जावळी, सातारा, कराड आणि पाटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि उपासक यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे जिल्हा सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष सचिन आढाव तसेच जिल्हा कार्यकारिणी-पदाधिकारी यांनी केले आहे.