महाबळेश्वर: निखिल परिवार, ज्यांनी अथक परिश्रमातून उद्योजक आणि समाजसेवी म्हणून आपला नावलौकिक केला आहे, त्यांच्या कुटुंबातील कन्या निधी विजय शिंदे यांनी आता कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश करून कुटुंबाचा वारसा पुढे नेला आहे.
नवी मुंबईच्या D. Y. पाटील LAW कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतलेल्या निधी यांनी मुंबई विद्यापीठाच्या विधी व न्याय क्षेत्रातील B. A. LL.B. परीक्षेत 89% गुणांसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन वकिलीची सनद मिळवली आहे. पुढे LL.M करून कुटुंबाबरोबरच समाजातील पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
निधी यांच्या या यशाबद्दल समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कुरोशी गावातही त्यांच्या यशाचा आनंद मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. निधी यांनी मुली स्वतःच्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात हे सिद्ध करून दाखवले आहे. मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते याचा आदर्श त्यांनी समाजातील मुलींसमोर ठेवला आहे.
निधी यांनी मिळवलेले यश त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि कुरोशी गावाला समर्पित केले आहे. निखिल परिवारासह कोयना सोळशी कांदाटी विभागातील जनतेने आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निधी यांच्या यशाचे अभिनंदन केले आहे.