डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी १५ पुस्तिका संचाचे प्रकाशन संपन्न

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा महाराष्ट्र अंनिसतर्फे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे डॉ. नरेन्द्र दाभोळकरांचे विचार घरोघरी या १५ पुस्तिका संचाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विनोद कुलकर्णी (कोषाध्यक्ष, म.सा.प.), यांच्या प्रमुख उपस्थिती व प्राचार्य डाॅ.शिवलिंग मेनकुदळे (सहसचिव ,रयत शिक्षण संस्था) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. विनोद कुलकर्णी म्हणाले, “डॉक्टरांचा खून केला त्याला आकरा झाले आहेत.विचार संपवण्यासाठी खून केला.पण, आज त्यांचा आकरावा स्मृतीदीन करत आहोत.म्हणजे विचार संपलेले नाहीत.देशातील एकमेव सातारा नगरपालिका आहे, डॉ दिभोलकरांच्या नावाने  पुरस्कार समाजासाठी काम करणाऱ्यास दिला जातो.”डॉ.प्रसन्न दाभोलकर म्हणाले, “विवेक म्हणजे योग्य-अयोग्य  समजून घेणं.सावित्रीबाई फुले सांगतात बुध्दि आणि ज्ञान यांची जोपासणा करत नाही.तो माणूस नाही.”

   

प्राचार्य प्रा. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, “सातारा जिल्ह्याचा प्रबोधनाचा वारसा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील ते डॉ. दाभोलकरांपर्यंत देशाला दिशा दर्शक आहे.त्याची जाण ठेवून युवा पिढीने हा विचार प्रचार आणि आचरण करणे गरजेचे आहे.” उदय चव्हाण यांनी  प्रास्ताविक केले.प्रा.मंडपे मॅडम यांनी पुस्तक परिचय करून दिला.आबासाहेब उमाप यांनी आभार मानले.यावेळी प्रशांत पोतदार,वंदना माने,डॉ.दिपक माने,भगवान रणदिवे,प्रकाश खटावकर, हौसेराव धुमाळ, जयप्रकाश जाधव,दत्ता जाधव, शशिकांत सुतार,विजय पवार, रुपाली भासले,योगिनी मगर, दशरथ रणदिवे आदी अंनिस कार्यकर्ते व शिक्षक,कर्मचारीवर्ग, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here