दहिवडी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांच्या टीमची संयुक्त कामगिरी
गोंदवले – दहिवडी पोलीस ठाणे रजिस्टर नंबर 317/2024, ipc 306, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि सावकारकी ऍक्ट प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात सुरज सुनील शीलवंत यांनी आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर आरोपी यांचा अटकपूर्व जामीन माननीय सत्र न्यायालय वडूज यांनी फेटाळल्यानंतर सुद्धा हे आरोपी फरार होते.
सदर आरोपींना पकडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांनी पथक नेमणेबाबत व आरोपी अटक करणेबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्यातील आरोपी नामे संजय शेडगे, आदर्श कट्टे हे अनुक्रमे मध्य प्रदेश, इंदोर आणि राजस्थान बॉर्डर येथे असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे नमूद दोन्ही आरोपींच्या बाबत खबऱ्यांमार्फत आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख सर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.
1)सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे
2)पोलीस हवालदार रामचंद्र आप्पासो तांबे
3)पोलीस हवालदार रविंद्र बनसोडे
4) पोलीस कॉन्स्टेबल गणेश पिराजी पवार