गोंदवले – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परकंदी येथील तंत्रस्नेही शिक्षक संजय गोरे सर यांनी या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.
मागील वर्षी शिक्षकांसाठी राबविण्यात आलेले शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती इयत्ता पहिली ते दुसरी ,तिसरी ते पाचवी ,सहावी ते आठवी ,नववी ते दहावी, अकरावी – बारावी व अध्यापक विद्यालय या विविध गटांमध्ये ही शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा पार पडली .त्यामध्ये गोरे यांनी सहावी ते आठवी या वयोगटांमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित महासागर या घटकावर आधारित उत्कृष्ट व्हिडिओ सादर केला होता आणि या व्हिडिओस या स्पर्धेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच 29 सप्टेंबर रोजी विद्या प्राधिकरण पुणे या ठिकाणी या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडणार आहे.
गोरे सरांच्या या व्हिडिओसाठी रुपये 40 हजार रुपयाचे बक्षीस तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र शासनाच्या वतीने त्यांना प्रदान करण्यात येत आहे त्यांच्या या यशाबद्दल डाएटचे तत्कालीन प्राचार्य रामचंद्र कोरडे,प्राचार्य अमोल डोंबाळे , शिक्षणाधिकारी शबनम मुजावर,अधिव्याख्याता विजय कोकरे, माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे , शिक्षणविस्तार अधिकारी नंदकुमार दंडीले ,रमेश गंबरे ,केंद्रप्रमुख साधना झणझणे,मुख्याध्यापक देवेंद्र पिसे, शाळा व्यवस्थापन समिती परकंदी, सर्व शिक्षक मित्रपरिवार व ग्रामस्थ परकंदी यांचेकडून कौतुक होत आहे